Goa News: मुकेश सिंग हत्या प्रकरणी विवेकदेव सिंगला जन्मठेपेची शिक्षा

Marathi Today's Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी
daily news in Marathi
daily news in MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: मुकेश सिंग हत्या प्रकरणी विवेकदेव सिंगला जन्मठेपेची शिक्षा

मे २०२० मध्ये राय येथे त्याचा सहकारी मुकेश सिंग (३०) याची हत्या केल्याबद्दल दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने विवेकदेव सिंगला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने १ लाख रुपयांचा दंडही ठोठावला आणि ७५,००० रुपये पीडितेच्या कुटुंबाला द्यायला सांगितले आहेत.

Goa News: प्रशासकीय विभाग पुन्हा कला अकादमीत

कला अकादमी इमारतीच्या नूतनीकरणाच्या कारणाने स्थलांतरित करण्यात आलेला कला अकादमीचा प्रशासकीय तसेच इतर विभाग आदिलशाह पॅलेस, जुने सचिवालयामधून पुनश्‍च कला अकादमीच्या इमारतीत प्रस्थापित करण्यात आला.

Goa Crime: गोव्यात बेकायदेशीर वाळू उत्खननाचा प्रकार

विर्डी येथे बेकायदेशीर वाळू उत्खनन प्रकार. डिचोली येथील मामलेदार यांनी तलाठींच्या अहवालावर कारवाई करण्यास विलंब केला म्हणून गोवा येथील मुंबई उच्च न्यायालयाने उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना डिचोली येथील मामलेदार यांना एससीएन जारी करण्याचे आणि त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्याचे निर्देश दिले. तसेच चौकशी करून २९ एप्रिल २०२५ रोजी पुढील सुनावणीच्या दिवशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

Goa Crime: बार्देशमधील उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयडी स्फोट घडवून आणण्याची धमकी

बार्देशमधील उपजिल्हाधिकारी कार्यालयात आयडी स्फोट घडवून आणण्याची धमकी. अज्ञाताने ई-मेलवरून दिली धमकी, बॉम्ब शोधक पथक रवाना.

Goa Political News: दीपक ढवळीकर - दामू नाईक भेट

मगोचे अध्यक्ष  दीपक ढवळीकरांनी पणजी भाजप कार्यालयात घेतली भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईकांची भेट. ऑल इज वॅल, दिपक यांची प्रतिक्रिया.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट!

मंत्रीमंडळ फेरबदलाची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट.

Goa News: गुटखाबंदीसाठी जागृती..!

गुटखा आदी तंबाखूजन्य पदार्थांवर आळा आणण्यासाठी अगोदर जागृती नंतर कारवाई. डिचोली पालिकेचा निर्णय.

Water Shortage: पाण्याची समस्या सुटली, अधिकाऱ्यांना भेट दिली कलिंगण

उसगांव गांजे पंचायतीच्या वार्ड क्रमांक 4 मधील पाण्याची समस्या सोडविल्याबद्दल काँग्रेस नेत्या मनिषा उसगांवकर व इतर महिलांनी अधिकाऱ्यांना भेट दिली कलिंगण. जेई यशराज तळपी आणि एई काशिनाथ सराफ यांचे मानले आभार. काही दिवसांपुर्वी ह्याच महिलांनी कार्यालयावर न्हेला होता घागर मोर्चा. फुटलेले पाईप दुरुस्त केल्याने आता दोन तास पूर्ण प्रेशरने येते नळांना पाणी.

Goa News: इंटरनेट केबल्सचे कटिंगवर तात्पुरता थांब

सरकारने सूचना दिल्या आहेत की इंटरनेट किंवा टीव्ही सेवा प्रदान करणाऱ्या केबल्स कापणे, तोडणे किंवा डिस्कनेक्ट करणे पुढील सूचना येईपर्यंत थांबवावे : CEE स्टीफन फर्नांडिस

Political News: लोकसभेत वक्फ विधेयक मंजूर

१२ तासांच्या चर्चेनंतर लोकसभेत वक्फ (सुधारणा) विधेयक मंजूर झाले, २८८ सदस्यांनी त्याच्या बाजूने मतदान केले तर २३२ सदस्यांनी विरोधात मतदान केले.

Goa Politics: मुख्यमंत्र्यांनी साळगांवचे आमदार केदार नाईक यांचे कौतुक केले, मंत्रिपद वाढण्याचे संकेत दिले

एक महत्त्वपूर्ण घडामोडीत, माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अल्टो पिळर्ण येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळावा कार्यक्रमात साळगांवचे आमदार केदार नाईक यांच्या समर्पित प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्यांनी मतदारसंघात केलेल्या प्रभावी कामाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी असेही सूचित केले की ते श्री केदार नाईक यांना त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांना एका चांगल्या पदावर नेण्याचा विचार करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com