Goa Hill Cutting  Dainik Gomantak
गोवा

Illegal Hill Cutting: डोंगर कापा, दंड भरा आणि मुक्त व्हा असा प्रघात नको! बांधकामे बेकायदा ठरवा, डोंगर पूर्ववत करून घ्या

Goa Bachao Abhiyan: यामुळे किंमती वाढवून ग्राहकांकडून अप्रत्यक्षपणे दंड वसूल केला जाईल; कायद्यातील ३९ अ कलमाच्या माध्यमातून उत्तेजनच मिळत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: बेकायदा डोंगरकापणी करणाऱ्यांना केवळ मोठा दंड आकारून चालणार नाही. कापलेला डोंगर त्यांच्याच खर्चाने पूर्ववत करून घ्यायला हवा अशी मागणी गोवा बचाव अभियानने केली आहे. काल नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी बेकायदा डोंगरकापणी करणाऱ्यांना भूखंडाच्या आकारानुसार १ कोटी रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येईल असे जाहीर केले होते.

याबाबत अभियानच्या निमंत्रक सबिना मार्टिन्स आणि सचिव रेबोनी सहा यांनी म्हटले आहे, की बेकायदा डोंगरकापणी करणाऱ्यांच्या विरोधात १ लाख रुपये ते १ कोटी रुपये असा दंड आकारून चालणार नाही. रेईश मागूश येथे झालेली डोंगरकापणी सर्वश्रुत आहे, तेथे ४० कोटी रुपयांना व्हिला विकत घेणाऱ्यांना १ कोटी रुपये दंडाचा धाक बसेल असे नाही.

फार तर यामुळे व्हिलाच्या किंमती वाढवून ग्राहकांकडून अप्रत्यक्षपणे दंड वसूल केला जाईल. नगरनियोजन कायद्यातील ३९ अ कलमाच्या माध्यमातून अशा गोष्टी करण्यास उत्तेजनच मिळत आहे. कोट्यवधी रुपयांचे घर घेण्यासाठी खर्च करणाऱ्यांना एक कोटी रुपये दंडापोटी खर्च करणे मोठे वाटणार नाही.

...तर चुकीचा प्रघात पडेल!

बेकायदा डोंगरकापणी करणाऱ्यांच्या मनात धडकी भरण्यासाठी कापणी केलेली जागा पूर्ववत, तीही कालबद्ध पद्धतीत करण्याचा नियम केला पाहिजे. बेकायदा डोंगरकापणी करून केलेले बांधकाम नियमित करण्यावर बंदी घातली पाहिजे. असे न करता केवळ दंडात्मक कारवाई करणे म्हणजे डोंगर कापा, दंड भरा आणि मुक्त व्हा असा प्रघातच पडून जाईल, असेही गोवा बचाव अभियानने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT