Illegal Hill Cutting: डोंगरकापणीविरुद्ध कारवाई करुन अहवाल सादर करा; केंद्रीय खात्याचे निर्देश

Sunil Kavthankar: डोंगर कापणीविषयी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याने दखल घेतली आहे; सुनील कवठणकर यांनी तक्रार दाखल केली होती
Sunil Kavthankar: डोंगर कापणीविषयी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याने दखल घेतली आहे; सुनील कवठणकर यांनी तक्रार दाखल केली होती
Goa Pradesh Congress Committee Vice President Sunil KavthankarDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Hill Cutting

पणजी: राज्यातील डोंगर कापणीविषयी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याने दखल घेतली आहे. या खात्याने राज्याच्या मुख्य वनसंरक्षकांना डोंगर कापणीविषयी योग्य ती कारवाई करण्याचे आणि त्याचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांनी ही तक्रार दाखल केली होती.

विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच राज्यातील डोंगरकापणीचा विषय सर्वत्र चर्चेचा ठरला आहे. नगरनियोजन खात्याकडे डोंगरकापणीच्या ९०० तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याशिवाय नगरनियोजन खात्याने सध्याच्या कायद्यात दुरुस्ती करून डोंगरकापणी करणाऱ्याला २५ लाखांचा दंड आकारण्याची तरतूद केली जाणार असल्याचे नुकतेच नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी जाहीर केले होते.

मोठ्या प्रमाणात डोंगरकापणीचा विषय गाजत असल्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष कवठणकर यांनी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेत राज्याच्या मुख्य वनपालांना केंद्रीय पर्यावरण खात्याकडून वरील आदेश आले आहेत.

Sunil Kavthankar: डोंगर कापणीविषयी केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल खात्याने दखल घेतली आहे; सुनील कवठणकर यांनी तक्रार दाखल केली होती
Morjim Hill Cutting: डोंगर कापणीत गुंतलेल्यांना कठोर शासन व्हावे; मोरजीवासीयांचे गाऱ्हाणे

‘डोंगर जपण्यासाठी आमचा लढा सुरूच’

केंद्राने बजावलेल्या आदेशपत्रामुळे आता वन खात्याला कार्यवाही करावी लागणार आहे. एका बाजूला नगरनियोजन खाते कायदे करीत असताना वन खात्याची भूमिका ठळकपणे जनतेसमोर आली नाही. आता ही सूचना आल्याने वन खात्याला कारवाईची पावले उचलावी लागतील, असे दिसते. राज्यातील वनाचे आच्छादन असणारे डोंगर जपण्यासाठी तसेच पर्यावरण वाचवण्यासाठी आम्ही आमचा लढा सुरू राहील, असे कवठणकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com