Goa News  Gomantak Digital Team
गोवा

Goa News : बेकायदा बंदुका येतातच कोठून ?

कायदा-सुव्‍यवस्‍था ढासळली : पोलिसांवरील गोळीबारानंतर पुन्‍हा प्रश्‍‍न ऐरणीवर

गोमन्तक डिजिटल टीम

सुशांत कुंकळयेकर

झुवारीनगर-वास्‍को येथील एका बंद बंगल्‍यावर दरोडा घालण्‍याचा प्रयत्‍न फसल्‍यानंतर पळून जाणाऱ्या चोरट्यांनी त्‍यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार केल्‍याने फक्‍त वास्‍कोतच नव्‍हे तर संपूर्ण राज्‍यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. या अशा बेकायदेशीर बंदुका राज्‍यात येतातच कोठून? हा प्रश्‍‍न त्‍यामुळे पुन्‍हा उपस्‍थित झाला आहे.

झुवारीनगर येथे झालेल्‍या या गोळीबारामुळे राज्‍यातील कायदा व सुव्‍यवस्‍था पूर्णत: ढासळली आहे हे आणखी‍ एकदा स्‍पष्‍ट झाले आहे. मागच्‍या वर्षी कुडचडेत रेतीमाफियांच्‍या भांडणातून अशाच प्रकारे बेकायदेशीर बंदुकीने गोळी झाडल्‍याने झारखंडच्‍या एका कामगाराचा मृत्‍यू झाला होता. या घटनेच्‍या दोन वर्षांअगोदर मडगाव येथील एका सराफाच्‍या दुकानात लूट मारण्‍यास आलेल्‍या आरोपीने गोळी झाडल्‍याने त्‍या युवक सराफाचा मृत्‍यू झाला होता.

त्‍यानंतर मेरशी येथे झालेल्‍या एका गँगवारात असाच गोळीबार झाला होता. तर, कुख्‍यात गुंड अन्‍वर शेख याच्‍यावर मडगावात दिवसाढवळ्‍या विरोधी गँगने हल्‍ला चढवला होता. त्‍याच्‍यावरही अशाच बेकायदेशीर बंदुकीने गोळी झाडली होती. गोव्‍यात या बंदुका येतातच कशा, याचा सखोल तपास करण्‍याची गरज वेळसाव येथील काँग्रेस नेते वॉलेन्‍सियो सिमॉईस यांनी व्‍यक्‍त केली आहे. संपूर्ण वास्‍को परिसर हे गुन्‍हेगारीचे आगर बनले आहे.

याविरोधात आम्‍ही पोलिसांकडेही तक्रारी केल्‍या, मात्र त्‍याचा काही उपयोग झाला नाही अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली. दरम्‍यान, गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनीही चिंता व्‍यक्‍त करताना पोलिसांवर गोळीबार करणे ही धक्‍कादायक बाब असून गोव्‍यात असे पहिल्‍यांदाच घडले असल्‍याचे सांगितले. गोवा सुरक्षित राहिलेला नाही हे त्‍यातून सिद्ध होत असल्‍याचे ते म्‍हणाले.

म्‍हापशातील ‘तो’ प्रकार

चोरट्यांचा पाठलाग करताना पोलिसांवर गोळीबार होण्‍याचे प्रकार राज्‍यात फारसे घडले नसले तरी बऱ्याच वर्षांपूर्वी म्‍हापशात असा प्रकार घडला होता. तेथे एका दरोड्यात पोलिसांवर असाच गोळीबार झाल्‍याने एक पोलिस जखमी झाला होता, अशी माहिती निवृत्त पोलिस अधीक्षक उमेश गावकर यांनी दिली.

त्‍यांनी संगितले की, दुकानाचे पुढचे शटर बंद करून आत दरोडेखोर वावरत होते. संशय आल्‍याने एका पोलिसाने शटर वर काढले असता दरोडेखोरांनी त्‍याच्‍या पायावर गोळी झाडली आणि ते फरार झाल. मात्र त्‍यांचा थरारक पाठलाग करून मळेवाडी (महाराष्‍ट्र) येथे त्‍यांना जेरबंद करण्‍यात आले होते, असे त्‍यांनी सांगितले.

ही कुठली दक्षिणेतील काशी? : विजय सरदेसाई

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी अलीकडेच ‘गोवा ही दक्षिणेतील काशी’ असा उल्‍लेख केला होता. मात्र, दिवसाढवळ्‍या महिलांच्‍या गळ्‍यातील सोनसाखळ्या हिसकावणे आणि पाठलाग करणाऱ्या पोलिसांवर गोळीबार करणे या घटना उघड झाल्‍यानंतर गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी, ही कुठली दक्षिणेतील काशी? असा खोचक सवाल केला.

ते म्‍हणाले, सध् राज्‍यात गुन्‍हेगारी वाढली आहे आणि त्‍यावर ज्‍यांनी वचक ठेवायचा, ते पोलिस आणि राजकारणी भ्रष्‍टाचारात गुंग आहेत. गुन्‍हेगारी आणि भ्रष्‍टाचार या जालीम कॉकटेलमध्‍ये गोमंतकीय भरडला जात आहे. अनियंत्रित पर्यटनामुळे गोव्‍यात बेकायदेशीर बंदुका, अंमलीपदार्थ, महिलांची तस्‍करी आदी प्रकार वाढले आहेत. यावर नियंत्रण आणावयाचे असेल तर मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यात गंभीरपणे लक्ष घालण्‍याची गरज सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

गोवा सुरक्षित नाही

पोलिसांवर गोळीबार करणे ही धक्‍कादायक बाब असून गोव्‍यात असा प्रकार पहिल्‍यांदाच घडला. गोवा सुरक्षित राहिलेला नाही हे त्‍यातून सिद्ध होते, असे गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT