गोवा

Illegal Construction: आगोंदामध्ये कासव संवर्धन क्षेत्रात बेकायदेशीर बांधकामे; परवाने रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका

Illegal Activities In Agonda Turtle Preservation Area: मूळ उत्तरप्रदेश येथील कासव संवर्धनाशी निगडित असलेल्या व वकील असलेल्या अमन गुप्ता याने ही जनहित याचिका सादर केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आगोंद-काणकोण येथील ‘ना विकास’ क्षेत्रातील कासव संवर्धन क्षेत्र म्हणून अधिसूचित केलेल्या समुद्रकिनाऱ्यावर सुरू असलेल्या बेकायदा व अनधिकृत बांधकामे व व्यावसायप्रकरणी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सादर करण्यात आली आहे. या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीअंती खंडपीठाने सरकारसह इतर प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. या समुद्रकिनाऱ्याचा तपासणी अहवाल सादर करण्यासाठी सुनावणी पुढील आठवड्यात सोमवारी (२० जानेवारी) ठेवण्यात आली आहे.

मूळ उत्तरप्रदेश येथील कासव संवर्धनाशी निगडित असलेल्या व वकील असलेल्या अमन गुप्ता याने ही जनहित याचिका सादर केली आहे. त्यामध्ये सरकारतर्फे (Government) मुख्य सचिव, गोवा किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण, आगोंद पंचायत, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, अग्निशमन दल याना प्रतिवादी केले आहे. सध्या सुरू असलेल्या बांधकामांना परवाने नसल्याने सर्व बेकायदा बांधकामे सील करण्याचे व ती पाडण्याचे निर्देश तत्परतेने सरकारला देण्यात यावेत. या बांधकामांना देण्यात आलेली सर्व परवाने रद्द करण्यात यावेत. सुनावणी सुरू असेपर्यंत या परिसरातील कोणत्याच रिसॉर्टस्, हॉटेल्स तसेच शॅक्स व झोपडवजा दुकानांना कसलीच परवाने न देण्याचे निर्देश दिले जावेत अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहेत. याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने वन खात्याला प्रतिवादी करण्याचे निर्देश दिले.

आगोंद येथे बेकायदा बांधकामे उभी राहत आहेत व त्यांना जीसीझेडएमएचा परवाना नाही. जरी परवाने देण्यात आले असतील ती चुकीची आहेत. व्यावसायिकांना पर्यावरण संवेदनशील आगोंद समुद्रकिनाऱ्यावर परवानगी देऊन तेथील पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे. या व्यावसायामुळे तेथे सांडपाणी निचरा, कचरा समस्या आहे. पर्यटक (Tourists) या समुद्रकिनाऱ्याला भेट देत असल्याने तेथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, ग्लास तसेच खाद्यपदार्थाच्या रिकाम्या पिशव्या टाकण्यात येत आहेत.

अधिसूचित क्षेत्र!

हा समुद्रकिनारा कासव संवर्धन म्हणून अधिसूचित करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना तसेच व्यवसायाला बंदी आहे. या ठिकाणी ओलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येत असतात. त्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. प्रतिवादी व्यावसायिकांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sawantwadi Crocodile: चिंता मिटली! 5 दिवसांनी 'मगरीला' पकडले, सावंतवाडीकरांनी टाकला सुटकेचा निःश्वास; मोती तलावात होणार 'विसर्जन'

Goa Live News: पणजीतील जुनी इमारत सील, हायकोर्टाने गोवा सरकारला फटकारले

Goa Fishing: 'कर्जाचे हप्ते भरावे लागतात, पगार द्यावा लागतो'! मच्‍छीमार समस्यांच्या गर्तेत; मासेमारी बंदी 90 दिवसांची करण्याची मागणी

Goa AAP: चार ‘गणपती’ येऊन गेले तरी खड्डे तसेच! खराब रस्त्यांविरुद्ध आप आक्रमक; ‘भाजपचे बुराक’ मोहीम राबवणार

Vasco: 'हे डबल इंजीन नसून डबल धोका सरकार'! LOP युरींचा घणाघात; वास्को ‘घोस्ट टाऊन’ बनवण्याचा डाव असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT