Illegal Construction: अखेर न्याय! असोल्डा कोमुनिदाद जागेतील बेकायदा बांधकामावर हातोडा; 6 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर कारवाई

Assolda Illegal Construction: असोल्डा येथे कोमुनिदाद जागेवर बांधण्यात अलेले बेकायदेशीर घराचे बांधकाम न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले.
Illegal Construction: अखेर न्याय! असोल्डा कोमुनिदाद जागेतील बेकायदा बांधकामावर हातोडा; 6 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर कारवाई
Illegal ConstructionDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: असोल्डा येथे कोमुनिदाद जागेवर बांधण्यात अलेले बेकायदेशीर घराचे बांधकाम न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले. सुमारे सहा वर्षे चाललेल्या प्रदीर्घ कायदेशीर लढाईनंतर बुधवारी (8 जानेवारी) ही कारवाई करण्यात आली, असोल्डा येथील ग्रामस्थांनी कोमुनिदाद जमिनीवर अनधिकृत बांधकामांबाबत तक्रार दाखल केली होती. सदर बंधकामविरोधात पंचायत, पंचायत संचालक, केपे कनिष्ठ न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसह प्रकरण अनेक कायदेशीर टप्प्यांतून गेले होते, शेवटी न्यायालयाच्या आदेशानुसार पाडण्यात आले.

केपेचे ममलातदार नाथन आफोंसो यांच्या नेतृत्वाखाली आज ही कारवाई करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, केपे पोलिस व वीज खात्याच्या सहकार्याने सदर बांधकाम पाडण्यात आले. यावेळी असोल्डा कोमुनिदादचे (Comunidade) अध्यक्ष आदित्य देसाई, वकील संजय राऊत देसाई आणि खजिनदार अच्युत राऊत देसाई सुद्धा उपस्थित होते. सदर बेकायदेशीर बांधकाम करणारे आणि आदित्य देसाई यांच्यात वाद झाला असता वेळीच पोलिसांनी यात हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Illegal Construction: अखेर न्याय! असोल्डा कोमुनिदाद जागेतील बेकायदा बांधकामावर हातोडा; 6 वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर कारवाई
Illegal Construction: बेकायदा बांधकाम पाडताय? नियमांत झाले मोठे बदल; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे परिपत्रक काय म्हणते वाचा

सरपंच किस्तोद फेर्नांडिस यांनी सांगितले की पंचायत मंडळाने या बांधकामाला कोणतेच दाखले दिले नव्हते. त्या घराला जी वीज जोडणी दिली होती, ती त्यांनी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घेतली होती. अनेक वर्षे कायदेशीर लढाई लढून न्यायालयाच्या (Court) आदेशानुसार आज हे बांधकाम पाडले गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com