Illegal Constructions Demolished Dainik Gomantak
गोवा

Illegal Constructions Demolished: याद राखा, अतिक्रमणे जमीनदोस्‍तच होणार! म्हापशात सहा बेकायदा बांधकामांवर फिरला ‘जेसीबी’

Mapusa Municipal Council: गैरप्रकारांना टाच लावण्‍यासाठी सावंत सरकारने बाह्या सरसावल्‍या आहेत. त्‍या अंतर्गत बेकायदा बांधकामांकडे मोर्चा वळवण्‍यात आला.

Manish Jadhav

म्हापसा: गैरप्रकारांना टाच लावण्‍यासाठी सावंत सरकारने बाह्या सरसावल्‍या आहेत. त्‍या अंतर्गत बेकायदा बांधकामांकडे मोर्चा वळवण्‍यात आला असून, म्‍हापसा-एकतानगर हाउसिंग बोर्डमध्‍ये भू-माफियाने बांधलेली सहा बेकायदा पक्की बांधकामे शुक्रवारी म्हापसा पालिकेने पोलिस संरक्षणात जमिनदोस्त केली. बेकायदा प्रकार खपवून घेणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्‍यात आला आहे.

दरम्यान, सिद्धिकी उर्फ सुलेमान खान याने जमीन बळकावलेल्या जमिनीवरील अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवण्यात आला. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात प्रशासकीय यंत्रणेकडून अतिक्रमण हटवण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. संशयित आरोपी सिद्दीकी उर्फ सुलेमान मोहम्मद खान (46) हा अट्टल गुन्हेगार असून, अनेक मालमत्ता फसवणुकीच्या प्रकारांमध्ये तसेच इतर गुन्ह्यांत सामील आहे. सध्या तो फरार आहे. सुलेमान याच्याविरुद्ध म्हापसा, वाळपई, हणजूण येथे मालमत्ता फसवणुकीचे गुन्हे प्रलंबित आहेत.

उपनिबंधकांच्‍या बनावट रबर स्टॅम्‍पचा वापर

1) एकतानगरमधील वरील सुमारे 20 हजार 819 चौ. मीटर जमीन उपनिबंधकांच्‍या बनावट रबर स्टॅम्‍पचा वापर करून व बनावट कागदपत्रे कायदेशीर असल्याचे भासवून आपल्या नावावर करण्‍यात आली होती.

2) या प्रकरणी सिद्दीकी उर्फ सुलेमान खान व इतरांविरुद्ध म्हापसा पोलिसांनी सप्टेंबर 2020 मध्ये भादंसंच्या कलमअंतर्गत बनावटगिरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

3) या प्रकरणी तत्कालीन उपनिबंधक अर्जुन शेट्ये यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. भूखंड करुन विक्रीस काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT