फोंडा: कुर्टी - खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर जमिनीवर उभारण्यात आलेली बांधकामे जमीनदोस्त करण्याची प्रक्रिया पंचायतीतर्फे सुरूच असून झिंगडीमळ भागातील एका माजी सरपंचाचे अनधिकृत बांधकामही पाडले गेले. यावेळी सरपंच नीळकंठ नाईक, माजी सरपंच भिका केरकर तसेच पंचायत सचिव सचिन नाईक आदी उपस्थित होते.
कुर्टी - खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच गुरुदास खेडेकर यांनी हे अनधिकृत बांधकाम उभे केले होते, मात्र पंचायतीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ते मोडण्याच्या तयारीत असताना खेडेकर यांनी आपण स्वतःच हे बांधकाम हटवणार असल्याचे पंचायतीला कळवले होते.
मात्र हे बांधकाम हटवले नसल्याने शेवटी पंचायतीनेच ते पाडले. दरम्यान, कुर्टी भागातील रस्त्यांच्या कडेला उभारलेल्या अनधिकृत बांधकामांवरही हातोडा पडणार असून त्यादृष्टीने पंचायतीने हालचाली सुरू केल्या आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यभर अशाप्रकारची बांधकामे पाडली जाणार असून त्यासाठीचे सर्वेक्षण संबंधित पंचायतीने करावे, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार ही कारवाई केली जात असल्याचे सरपंच नीळकंठ नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पंचायतीच्या मोकळ्या जागा हडप करण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते, पण ते आता शोधून काढून मोकळे करण्यात येणार असल्याचे पंचायतीने स्पष्ट केले. पंचायत सध्या ॲक्शन मोडमध्ये असून अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारला जात आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.