Curti Khandepar: कुर्टीतील सात भंगारअड्ड्यांवर होणार कारवाई! सरपंचांनी पंचांसह केली पाहणी

Curti Khanddepar Scrapyards: कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेकायदा भंगार अड्ड्यांची पाहणी पंचायत मंडळातर्फे करण्यात आली.
Curti Scrapyards Inspection
Curti ScrapyardsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील बेकायदा भंगार अड्ड्यांची पाहणी गुरुवारी सकाळी पंचायत मंडळातर्फे करण्यात आली. यापैकी सात भंगार अड्ड्यांना पंचायतीने नोटीस जारी केली आहे.

यावेळी सरपंच अभिजित गावडे, पंच हरेश नाईक, सचिव सचिन नाईक व पंचायत कर्मचारी उपस्थित होते. कुर्टीत हे सात भंगारअड्डे असून ते त्वरित खाली करण्याची नोटीस पंचायतीतर्फे बजावण्यात आली आहे. त्याअनुषंगाने ही पाहणी करण्यात आली आहे. या भंगारअड्ड्यांवर त्वरित कारवाई केली जाईल, असे सरपंचांनी स्पष्ट केले.

Curti Scrapyards Inspection
Goa Mining: ..अखेर डिचोलीत ट्रक धावले! खनिजवाहतूक बेकायदेशीर,अवमान करणारी असल्याचा शेतकऱ्यांचा दावा

कुर्टीतील नागरी वस्तीच्या जवळ सात भंगारअड्डे आहेत. या भंगारअड्ड्यांना कोणतेच कायदेशीर परवाने नाहीत. यापूर्वीही पंचायतीने काही बेकायदा भंगारअड्डे हटविले आहेत. सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळे ही कारवाई झाली होती. गुरुवारी पंचायत मंडळाने भंगारअड्ड्यांची पाहणी केली. हे भंगारअड्डे संबंधितांनी त्वरित हटविले नाही तर पंचायत कारवाई करील, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com