Club Tao Demolition Dainik Gomantak
गोवा

Club Tao Demolition: बेकायदा ‘क्लब ताओ’वर हातोडा; कळंगुट पंचायत ॲक्शन मोडवर

गोमन्तक डिजिटल टीम

कळंगुट: कळंगुट -बागा रस्त्यावर गेले अनेक महिने बेकायदा कार्यरत असलेल्या ‘क्लब-ताओ’ वर न्यायालयाच्या आदेशानुसार कळंगुट पंचायत मंडळाने सोमवारी पाडण्याची कारवाई केली. यावेळी उत्तर गोवा उप-जिल्हाधिकारी, बार्देश तालुका दंडाधिकारी तसेच बार्देश तालुका गट विकास अधिकारी तसेच पंचायत सचिव अर्जुन वेळीप उपस्थित होते.

दरम्यान, कळंगुट पोलिस पथक क्लबवर पाडण्याची कारवाई होईपर्यंत परिसरात कडक पहारा ठेवून होते. दरम्यान, कळंगुट व परिसरात बेकायदा कार्यरत असलेल्या नाईट क्लबवर कायद्यानुसार वेळोवेळी कारवाई करण्यास सज्ज असून सोमवारी पाडण्यात आलेल्या बेकायदा क्लब- ताओ या नाईट क्लबसंबंधात पर्यटक तसेच स्थानिकांकडून अनेक तक्रारी पंचायत मंडळाकडे दाखल करण्यात आल्या होत्या.

या सर्व तक्रारींना अनुसरून दाखल तक्रारीनुसार शेवटी आज न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे पंचायत सचिव अर्जुन वेळीप यांनी यावेळी स्थानिक प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'गुंतवणूकदारांनी मोठ्या संख्‍येने गोव्‍यात यावे'; गुजरातमधील परिषदेत मुख्‍यमंत्री सावंतांचे आवाहन

Cutbona Jetty: कुटबण- मोबोर येथे आणखी ४ कॉलराबाधित सापडले! 'संख्‍या १८७' वर

St Estevam Accident: बाशुदेव कडे होते रोख '१ लाख' रुपये? २३ सप्टेंबरनंतरच ‘ती’ जबाब द्यायला गोव्यात येणार

Goa Cabinet Reshuffle: पक्षश्रेष्ठी महाराष्ट्राच्या निवडणुकीत गर्क; गोवा मंत्रिमंडळाची पुनर्रचना पुन्हा लांबणीवर

Goa Accidents: गोव्यात अपघातांचे सत्र सुरूच! आणखी तीन बळी; मांद्रेतील तिसऱ्या तरुणीचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT