Illegal Call Centre Dainik Gomantak
गोवा

Colvale Fake Call Centre Busted: ॲमेझॉन बोगस कॉल सेंटरमधून लाखो अमेरिकनांना घातली टोपी

ऑनलाईन रॅकेट : 25 पुरुष, 8 महिलांसह 33 जणांना अटक : सामग्री जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Fake Call Centre Busted: कोलवाळ येथील कविश रेसिडेन्सी इमारतीच्या तळघरात सुरू असलेल्या बोगस ॲमेझोन कॉल सेंटरवर सोमवारी मध्यरात्री क्राईम ब्रँचच्या पथकाने छापा टाकला.

या कारवाईत 33 परप्रांतियांना अटक केली असून यामध्ये 25 पुरुष व 8 महिलांचा समावेश आहे.

या सेंटरमध्ये वापरात असलेल्या 26 संगणकांसह राऊटर्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक सामग्री जप्त केली आहे. संशयितांनी अमेरिकन नागरिकांना लक्ष्य केले होते.

संशयितांविरुद्ध फसवणूक, कट-कारस्थान व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा नोंदवून अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना लाखोंना लुटले असण्याची शक्यता आहे.

जप्त केलेल्या संगणकांतून तसेच प्रत्येकाची जबानी नोंदवून माहिती जमा करण्यात येत आहे, असे वाल्सन यांनी सांगितले.

या सेंटरचा प्रमुख गुजरातमधील असून इतर संशयित महाराष्ट्र, मेघालय, नागालॅण्ड, मिझोराम, गुवाहाटी, मणिपूर येथील आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक नितीन हळर्णकर करत आहेत.

या टोळीमध्ये काही महिलांचाही समावेश होता. या सेंटरचा म्होरक्या जिगर परमार याने ज्या ३२ लोकांना या सेंटरसाठी नियुक्त केले होते, त्यांना या कॉलच्या सत्यासत्यतेची माहिती होती का, याबाबतही चौकशी सुरू आहे.

मुख्य सूत्रधाराला पोलिस कोठडी

क्राईम ब्रँचने अटक केलेल्या 33 जणांना आज न्यायालयात कोठडीसाठी उभे करण्यात आले. त्यातील मुख्य सूत्रधार जिगर परमार याला एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली, तर इतर 32 जणांना न्यायालयीन कोठडी बजावण्यात आली आहे.

या सर्व संशयितांना पोलिस कोठडीत ठेवण्याची व्यवस्था नसल्याने चौकशीसाठी संशयितांची गरज लागेल, तशी न्यायालयाच्या परवानगीने त्यांना पोलिस कोठडी देण्यात येणार आहे.

सायबर पथक करणार उलगडा

या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचतर्फे करण्यात येत आहे. यातील सर्व व्यवहार इंटरनेट व संगणकाच्या माध्यमातून झाले आहेत.

त्यामुळे सायबर क्राईमच्या मदतीने माहिती मिळवण्‍याचा प्रयत्न सुरू आहे. या टोळीने गेल्या दोन महिन्यांत कितीजणांना गंडा घातला, याची माहिती तपासानंतरच उघड होणार आहे.

रात्रीस खेळ चाले...

संशयितांनी दोन महिन्यांपूर्वी कोलवाळ येथील इमारतीच्या तळघरातील खोर्ली-म्हापसा येथील तारक आरोलकर यांच्या मालकीची जागा भाड्याने घेतली होती. ते तेथे बोगस कॉल सेंटर चालवत होते.

या प्रकरणाची माहिती क्राईम ब्रँचला मिळाली होती. अमेरिकन नागरिकांना वस्तू खरेदीसंदर्भातील माहिती देण्यासाठी हे सेंटर रात्री 12 ते पहाटे 6 वाजेपर्यंत सुरू ठेवले जात होते.

त्यामुळे पूर्ण फौजफाट्यासह क्राईम ब्रँचने सोमवारी मध्यरात्री येथे छापा टाकला आणि संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

या संशयितांच्या आवळल्या मुसक्या

जिगर परमार (गुजरात),

अभिनव सिंग (मुंबई),

गिरीश खरात (मुंबई),

ख्रिस डिसोझा (मुंबई),

नरेंद्र राठोड (गुजरात),

जुनेद अली (मेघालय),

प्रतीक चव्हाण (कांदिवली),

अझुंग रोंगमई (गुवाहाटी),

सॅम्युएल लालरावटांगघेटा (मिझोराम),

साईमिलेहा फर्नांडिस (मेघालय),

पप्पा गोपाल (आसाम),

तायशैलाँगा सोहतून (मेघालय),

रोनाल्ड मरक (मेघालय),

ॲण्डरसन खोन्गसीट (मेघालय),

बनी रिचर्ड मार्प्ना (मेघालय),

यपन शेरॉन मॅथ्यू (मणिपूर),

टी थंगखानसुआन सिमटे (मणिपूर),

मंगकारा मोंगरूम (मेघालय),

थांगलिसे संगतम (मेघालय),

पैला कितदोर मारिंग (मेघालय),

शाहरूख हुसेन (मुंबई),

आमिर शेख (मुंबई),

झिंगसँग लिंगडो (मेघालय),

डॅम डुनाई (मेघालय),

पीटर रावते (मेघालय),

किंगवांगली (नागालँड),

नेहा कोथेकर (मुंबई),

लेन शोंगपी (नागालँड),

मिमी नोकलाँग (नागालँड),

आरेन झामीर (नागालँड),

लालबियाकमावी (मिझोराम),

संजना कुमारी शहा (मेघालय)

जेसिका खियांगटे (मेघालय).

कॉल सेंटरचे गुजरात कनेक्शन

कोलवाळ येथील कविश रेसिडेन्सीच्या तळघरातील जागेत हे बोगस कॉल सेंटर सुरू होते, त्या जागेची मालकी म्हापशाचे नगरसेवक तारक आरोलकर यांच्याकडे आहे. या सेंटरचा व्यवस्थापक तसेच मुख्य सूत्रधार गुजरातमधील जिगर परमार हा आहे.

त्यानेच आरोलकर यांच्याशी भाडेपट्टीचा करार केला होता. त्यामुळे आरोलकर यांना या सेंटरबाबत माहिती होती की नाही यासंदर्भातील चौकशीसाठी त्यांना समन्स बजावण्यात येणार आहे.

या कॉल सेंटरचे कनेक्शन गुजरातमध्येही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ऑनलाईन फसवणूक प्रकरणात गुजरात पोलिसांचीही मदत घेण्यात येत आहे.

...अशी होती मोडस् ऑपरेंडी

1. या सेंटरमधून अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधला जात होता.

2. जे कोणी ‘ॲमेझॉन’च्या वस्तू खरेदी करत होते, त्यांच्या अकाऊंट्सवर जाऊन त्यांच्याशी संशयित संपर्क साधत होते.

3. ‘ॲमेझॉन’च्या ग्राहक केंद्रातून कर्मचारी बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्‍वास संपादन करत होते.

4. ज्यांना ‘ॲमेझॉन’च्या वस्तू हव्या असत, त्यासाठी त्यांच्याकडून पैसे उकळून त्याच्या बदल्यात बोगस गिफ्ट कार्ड देत होते.

माझेच नाव चर्चेत : आरोलकर

ऑगस्टमध्ये ही जागा मी संबंधितांना भाडेपट्टीवर दिली. तिथे ते काय करतात, हे मी पाहिले नव्हते. माझ्या जागेत बोगस कॉल सेंटर चालते, हे कळल्यानंतर मला खूप मन:स्ताप झाला. माझे कर्मचारी संबंधितांकडून भाडे गोळा करायचे.

कधी थेट खात्यात पैसे जमा करायचे. जे बोगस कॉल सेंटर चालवत होते, त्यांची नावे समोर आलेली नाहीत आणि माझेच नाव जास्त चर्चेत आहे, हे योग्य नव्हे, असे आरोलकर म्हणाले.

दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

मुळात जे दोषी आहेत आणि ज्यांनी गैरकृत्य केले आहे, त्यांची नावे समोर यायला हवीत. मी जागा कायदेशीर करार करूनच जागा दिली होती. करार करताना मी योग्य अटी व नियमांचा समावेश करतो.

भाडेकरूने त्या जागेत कुठलेही बेकायदा काम करू नये, असा उल्लेखही असतो. संशयितांनी बोगस कॉल सेंटर चालवले असून त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे, असेही आरोलकर यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'फर्स्ट क्लास' ऑरा; 'जेलर 2' च्या शूटिंगसाठी गोव्याला रवाना, सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल Watch Video

Goa Tourism: 500 वर्षांपूर्वीचे दगड, पोर्तुगीज कालीन किल्ला, गर्दीपासून दूर 'या' गावाने जपलेय 'पारंपरिक पर्यटन'

IND vs AUS 1st T20: ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी-20 सामना रद्द! पुन्हा एकदा पाऊस ठरला व्हिलन; फॉर्ममध्ये परतला कर्णधार 'सूर्या'

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षकांची चौकशी करा, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मडगावच्या PSI विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

IND vs AUS 1st T20: सर्वात जलद 150 षटकार...! कर्णधार सूर्यकुमार यादवचं धूमशान, तूफानी षटकार ठोकत रोहित शर्माला सोडले मागे; व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT