Lost Tourist in Calangute: मानसिकदृष्ट्या अस्थिर परदेशी नागरिक गजबजलेल्या कळंगुटमध्ये हरवला, पोलिसांचे कौतुकास्पद कृत्य

बेपत्ता झाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन केले.
Calangute Police
Calangute PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Lost Tourist in Calangute: उत्तर गोव्यातील कळंगुट (Calangute) परिसरात नेहमीच पर्यटकांची रेलचेल असते. दररोज हाजारो पर्यटक कळंगुट बीच आणि येथील मार्केटमध्ये फिरत असल्यामुळे हा भाग नेहमीच गजबजलेला असतो.

दरम्यान, अशा गजबजलेल्या परिसरात मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेला परदेशी नागरिक अचानक हरवतो आणि त्याच्या मदतीला पोलिस धावतात.

(Calangute Police Station reunites Foreign National with care taker)

Calangute Police
Bandodkar T-20 League: बांदोडकर करंडक! चौगुले, पणजी जिमखान्याची विजयी सलामी

झाले असे की कळंगुटमध्ये फ्रेंच नागरिक ब्रेन बर्नार्ड हंट बेपत्ता झाले. ब्रेन यांची मानसिक स्थिती स्थिर नाही. बेपत्ता झाल्यानंतर स्थानिकांनी त्यांना कळंगुट पोलिसांच्या स्वाधीन केले. बेपत्ता परदेशी नागरिकासोबत कोण असेल याची माहिती घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.

कळंगुट पोलिसांनी थोडीही दिरंगाई न करता तपास यंत्रणा सज्ज केली आणि ब्रेन यांच्या नातेवाईकांचा शोध सुरू झाला. कळंगुट पोलिसांनी स्थानिक नागरिक, हॉटेलवाले, नातेवाईक व मित्राची सखोल चौकशी केली. अखेर ब्रेन यांचा केअर टेकर अँथनी पी याचा शोध पोलिसांना लागला.

Calangute Police
Flight To Goa: मोपालाच पसंती, आणखी एका शहरातून सुरू झाली थेट विमानसेवा

पोलिसांनी तात्काळ केअर टेकर अँथनी पी याला घेऊन पोलिस स्टेशन गाठले व फ्रेंच नागरिक ब्रेन बर्नार्ड हंट व त्याची भेट घडवून आणली.

कळंगुट पोलिस दाखवलेल्या तत्परतेचे आणि माणसकीचे दर्शन याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com