IND vs SA 2nd Test: गुवाहाटी कसोटीपूर्वी मोठा धक्का, शुभमन गिलनंतर आणखी 3 खेळाडू रुग्णालयात दाखल; कारण काय?

South Africa Cricketer Injury: मालिका जिंकण्यासाठी आफ्रिकेला गुवाहाटी येथील दुसरी कसोटी जिंकणे गरजेचे आहे, पण या महत्त्वपूर्ण सामन्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला एक मोठा धक्का बसला आहे.
South Africa Team
South Africa Team Dainik Gomantak
Published on
Updated on

IND vs SA 2nd Test: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या कसोटी मालिका खेळली जात आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत 30 धावांनी विजय मिळवला. 2 सामन्यांच्या मालिकेत आफ्रिकेने 1-0 अशी आघाडी घेतली. आता मालिका जिंकण्यासाठी आफ्रिकेला गुवाहाटी येथील दुसरी कसोटी जिंकणे गरजेचे आहे, पण या महत्त्वपूर्ण सामन्याआधी दक्षिण आफ्रिका संघाला एक मोठा धक्का बसला. संघाचे तीन महत्त्वाचे आणि मॅच-विनर खेळाडू रुग्णालयात दाखल झाले.

दक्षिण आफ्रिकेचे 3 खेळाडू रुग्णालयात

'रेव स्पोर्ट्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचे तीन खेळाडू कोलकाता येथील वुड्लँड्स रुग्णालयात (Hospital) पोहोचले आहेत. या तीन खेळाडूंमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा हिरो ठरलेला अष्टपैलू खेळाडू मार्को यानसेन, तसेच फिरकी गोलंदाज सायमन हार्मर आणि अनुभवी फिरकीपटू केशव महाराज यांचा समावेश आहे. हे तिन्ही खेळाडू आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल झाले. मात्र, यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, या खेळाडूंच्या तंदुरुस्तीबद्दल आणि दुसऱ्या कसोटीतील त्यांच्या सहभागाबद्दल कोणतीही अधिकृत माहिती सध्या समोर आलेली नाही.

South Africa Team
IND vs SA 1 Test: टीम इंडियाला डबल झटका! लाजिरवाण्या पराभवानंतर WTC पॉईंट्स टेबलमध्ये घसरण; दक्षिण आफ्रिकेने मारली बाजी

भारतासाठी चिंता वाढवणारे खेळाडू

कोलकाता येथील पहिल्या कसोटी सामन्यात या तिन्ही खेळाडूंनी भारतीय संघाला (Team India) खूप जास्त अडचणीत आणले. मार्को यानसेन याने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच, सायमन हार्मर आणि केशव महाराज या दोन्ही फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. असे महत्त्वाचे खेळाडू गुवाहाटी कसोटीत खेळू शकले नाहीत, तर कर्णधार टेम्बा बावुमा आणि संपूर्ण आफ्रिकन संघासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते.

यापूर्वीच, वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा दुखापतीमुळे कोलकाता कसोटीत खेळू शकला नव्हता. त्यामुळे आता या तीन खेळाडूंच्या दुखापतीमुळे संघाची चिंता अधिक वाढली आहे.

South Africa Team
IND vs SA 1st Test: दक्षिण आफ्रिकेचा 'मास्टरस्ट्रोक', 15 वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकली; टीम इंडियाचा 30 धावांनी लाजिरवाणा पराभव

संघात कोणाला संधी मिळू शकते?

जर हे तीन खेळाडू गुवाहाटी कसोटीसाठी वेळेत तंदुरुस्त होऊ शकले नाहीत, तर कर्णधार टेम्बा बावुमाला प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करावे लागतील. मार्को यानसेनच्या जागी आता तंदुरुस्त झालेल्या कगिसो रबाडाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता आहे. सायमन हार्मरच्या अनुपस्थितीत सेनुरन मुथुस्वामी याला खेळण्याची संधी मिळू शकते. तर केशव महाराज हा अनुभवी गोलंदाज आहे. जर तो खेळू शकला नाही, तर त्याच्या जागी संघात कोणाला संधी मिळेल, हे अद्याप निश्चित झालेले नाही.

दक्षिण आफ्रिका संघाची नक्कीच ही इच्छा असेल की, हे तिन्ही खेळाडू गुवाहाटी कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात उतरावेत. कारण, या महत्त्वाच्या खेळाडूंच्या उपस्थितीनेच ते भारतीय संघावर अधिक दबाव टाकण्यात यशस्वी ठरतील. आता या दुखापतींच्या संकटातून आफ्रिकेचा संघ कसा मार्ग काढतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com