Goa Police Arrests In Beef Case Dainik Gomantak
गोवा

Illegal Beef Trafficking: बेकायदा गोमांसाची वाहतूक करणारे आणखी दोघेजण अटकेत, वाळपई पोलिसांची कारवाई; मुद्देमाल जप्त

Goa Police Arrests In Beef Case: वाळपई पोलिसांनी केरी नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक केल्याचा पर्दाफाश करत शनिवारी रात्री चौघांना अटक केली होती.

Manish Jadhav

Illegal Beef Transportation Valpoi Police Arrest Two More

वाळपई: बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी गोवा पोलिसांच्या धडक कारवाया वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी, केरी-सत्तरी चेकपोस्टवर पोलिसांनी मोठ्याप्रमाणावर गोमांस जप्त केले होते. यातच आता, वाळपई पोलिसांनी पुन्हा एकदा गोमांस वाहतूक प्रकरणी आणखी दोघांना अटक केली.

वाचा नेमकं प्रकरण?

दरम्यान, वाळपई पोलिसांनी बेकायदेशीर गोमांस वाहतूक प्रकरणी दोन जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये आसिफ रहिमथुल्ला चौधरी (रा. म्हापसा), कार क्रमांक जीए-03-वाय-7867 चा मालक, तर  जावेद नजीर अहमद तांबोळी (रा. कारेवाडा, वास्को, मूळ रहिवासी बेळगाव), वाहन क्रमांक जीए-05-बी-9993 चा मालक आहे. वाळपई पोलिसांनी केरी नाकाबंदी दरम्यान बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक केल्याचा पर्दाफाश करत शनिवारी रात्री चौघांना अटक केली होती. वाळपई (Valpoi) पोलिसांनी या कारवाईत दोन वाहनांसह सुमारे 2.75 लाखांचे गोमांस जप्त केले.

बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई

काही दिवसांपूर्वी, केरी चेकपोस्टवरच एका बेकायदेशीर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली होती. बेळगावहून गोव्याच्या दिशेने सय्यद इस्माईल मरचोनी (रा. पेडणे) हा टेम्पो घेऊन (जीए-09-06 यु 6352) केरी चेकपोस्टवर आला असता पोलिसांनी त्याला अटक केली होती. पोलिस तपासादरम्यान त्याच्याकडे मांस वाहन परवाना नसल्याचेही उघड झाले होते. या संदर्भात बेळगावहून गोव्याच्या (Goa) दिशेने गोमांसाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सय्यद याच्या मुसक्या आवळल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

Goa Rain Water Harvesting: 47 सरकारी शाळांतच 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'! राज्यातील 7 टक्के शाळांकडून सरकारी धोरणाला प्रतिसाद

SCROLL FOR NEXT