Beef Smuggling: चिकनच्या नावाखाली दिल्लीतून गोव्यात होतेय 'गोमांस' तस्करी, अनेक वर्षांपासून सुरुये गोरखधंदा?

Delhi to Goa Beef Smuggling: रेल्वेच्या पार्सल सेवेच्या तपासणीत असलेल्या त्रुटीचा फायदा घेतायेत तस्कर.
Delhi to Goa Beef Smuggling Case
Beef SmugglingDainik Gomantak
Published on
Updated on

Beef smuggling to Goa

मडगाव: गेल्या काही दिवसांपूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावर ५०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे दिल्लीतून गोव्यात गोमांस तस्करी होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. चिकनच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलद्वारे ही तस्करी गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, गोव्यातील गोमांस मागणी आणि तुटवडा लक्षात घेता चिकनच्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या पार्सलद्वारे गोमांस तस्करी केली जात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी रेल्वेच्या पार्सल तपासणीसाठी बनावट कागदपत्रे तयार केली जातात.

पार्सलला चिकनचे लेबल लावून याद्वारे तपास अधिकाऱ्यांना गंडवले जात असावे, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु असावा असाही संशय व्यक्त केला जात आहे.

Delhi to Goa Beef Smuggling Case
Lavoo Mamledar Death Case: सनदीचा मुक्काम तुरुंगातच! लवू मामलेदार मृत्यू प्रकरणी कोर्टाचा दिलासा नाहीच

गेल्या काही दिवसांपूर्वी मडगाव रेल्वे स्थानकावर दीड लाख किंमतीचे ५१४.५ किलोग्रॅम वजनाचे गोमांस जप्त करण्यात आले. हे पार्सल दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरुन गोव्यात वितरित करण्यासाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती कोकण रेल्वेचे पोलिस निरिक्षक सुनिल गुडलर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिली आहे.

रेल्वेच्या पार्सल सेवेच्या तपासणीत त्रुटी आहेत आणि याची पुरेपुर माहिती गोमांस तस्कारांना आहे, अशी माहिती वृत्तात देण्यात आली आहे. चिकनच्या नावाने पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये गोमांस होते हे तपासणीत समोर आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. अलिकडच्या काळात गोव्यात निर्माण झालेल्या गोमांस तुटवड्यामुळे मागणी वाढल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Delhi to Goa Beef Smuggling Case
Goa Crime: होळीच्या दिवशी बिहारच्या युवकाने गोवा बीचवर असं काय खाल्लं की त्याचा मृत्यू झाला?

गोव्यात गोमांस आणि कत्तलखाने याविरोधातील वाढता विरोधानंतर गोमांसाचा तुटवडा निर्माण झाला. दरम्यान, मडगाव येथे करण्यात आलेली कारवाई केवळ हिमनगाचे टोक असण्याची शक्यता आहे. तस्करीचे हे जाळे मोठे असण्याची शक्यता आहे. पोलिस याप्रकरणी मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com