Panaji  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : गोव्याच्या दालनाला पुरस्कार; ‘आयआयटीएफ’ २०२३

Panaji News :दिल्लीत सर्वोत्कृष्ट ‘थिमॅटिक’ सादरीकरण

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर आयोजित ‘आयआयटीएफ’ २०२३ मध्ये गोव्याच्या दालनाला थिमॅटिक (विषयगत) सादरीकरणातील सर्वोत्तमतेसाठी विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या पुरस्कारासाठी मिळालेले प्रमाणपत्र व चषक माहिती आणि प्रसिध्दी खात्याचे संचालक दीपक बांदेकर, इव्हेंट मॅनेजमेंट एजन्सी ॲडव्हर्टायजिंग असोसिएटस्‌चे संस्थापक केदार धुमे यांनी बुधवारी मंत्रालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सुपूर्द केले.

गोव्याच्या दालनात ‘स्वयंपूर्ण कार्यक्रम २.०’ वर प्रकाशझोत टाकण्यात आला, जे व्यापार महोत्सवाच्या वसुधैव कुटुंबकम या आशयाशी जुळणारे होते.

गोव्याच्या दालनाच्या प्रवेशद्वारावर गोव्याला स्वयंपूर्ण बनविण्याच्या प्रयत्नांसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची प्रशंसा करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश प्रदर्शित करण्यात आला होता.

अन्य प्रदर्शित पॅनलवर ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ यासाठी गोवा राज्याच्या प्रयत्नांची माहिती देणारा संदेश उल्लेखनीय ठरला.

नोडल एजन्सी असलेल्या गोव्याच्या माहिती आणि प्रसिध्दी खात्यातर्फे गोवा दालन उभारण्यात आले. गोवा हे जागतिक गुंतवणुकीसाठीचे एक स्थळ म्हणून पुढे आणण्यासाठी घेतलेल्या पुढाकारांची माहिती येथे देण्यात आली.

तसेच जी२०, इफ्फी महोत्सव, आयर्नमॅन, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशा विविधांगी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनांमुळे गोवा अशा उपक्रमांसाठी राजधानी ठरविण्यासाठी प्रयत्न होत आहेत, याकडे येथे लक्ष वेधण्यात आले.

गोवा दालनाची संकल्पना, रचना आणि व्यवस्थापन ॲडव्हर्टायजिंग असोसिएटस्‌ या मान्यवर संस्थेची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT