Goa Invest Summit 2024: पुढील आठवड्यात गोव्यात 'इन्व्हेस्ट गोवा समिट', 400 प्रतिनिधी घेणार सहभाग

आत्तापर्यंत सुमारे 350-400 नोंदणी प्राप्त झाल्या आहेत आणि पुढील दोन-तीन दिवसांत आणखी नोंदी होणे अपेक्षित आहे.
Goa Invest Summit 2024
Goa Invest Summit 2024
Published on
Updated on

Goa Invest Summit 2024: 'इन्व्हेस्ट गोवा 2024 समिट'मध्ये 400 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. 29 जानेवारीपासून येथे ‘इन्व्हेस्ट गोवा 2024 समिट’ आयोजित करण्यात आल्याची माहिती उद्योग आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

आत्तापर्यंत सुमारे 350-400 नोंदणी प्राप्त झाल्या आहेत आणि पुढील दोन-तीन दिवसांत आणखी नोंदी होणे अपेक्षित आहे, अशी माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक यांनी गुरुवारी पीटीआयला दिली.

‘इन्व्हेस्ट गोवा 2024 समिट’ हा गोवा औद्योगिक विकास महामंडळ (Goa -IDC) आणि भारतीय उद्योग महासंघ (CII) यांचा संयुक्त कार्यक्रम आहे.

लॉजिस्टिक आणि वेअरहाउसिंग क्षेत्रातील प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. वैद्यकीय उपकरणे, अन्न प्रक्रिया क्षेत्र, फार्मास्युटिकल क्षेत्र, रिअल इस्टेट आणि मनोरंजन उद्योग आणि आयटी आणि आयटीईएस कंपन्यांचे शिष्टमंडळ सहभागी होणार आहे, अशी माहिती प्रविमल अभिषेक यांनी दिली.

या समिटमध्ये गोवा आयडीसीने राज्यात व्यवसाय सुलभतेसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा शुभारंभ आणि गोव्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या उद्योगांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येईल, असे मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.

गोवा नितळ पर्यटनासाठी ओळखला जातो. इन्व्हेस्ट गोवा 2024 सारख्या समिटमुळे नवीकरणीय ऊर्जा, लॉजिस्टिक आणि वेअरहाऊसिंग, आयटी आणि आयटीईएस यासारख्या नवीन आणि विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करून राज्याच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणण्यास मदत होते, असे माविन गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com