Kadamba Electric Bus  Dainik Gomantak
गोवा

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

EV Buses In Goa: या उपक्रमांतर्गत बसेसच्या रोल आउटवर सध्या अंतिम चर्चा सुरू आहे. आंतरराज्य सेवा देखील पुन्हा सुरू करू शकतो, असे तुयेकर म्हणाले.

Pramod Yadav

पणजी: गोव्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी इलेक्ट्रिक बस सुरू करण्यासाठी भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांच्या 700 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सांगितले.

राज्याच्या परिवहन महामंडळाला पुनरुज्जीवित करण्यासाठी हा प्रस्ताव स्वागतार्ह आहे, असे मत कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर म्हणाले.

"आयआयटीचा माजी विद्यार्थ्यांने राज्यातील सार्वजनिक सार्वजनिक वाहतुकीच्या पुनरुज्जीवनासाठी 700 कोटी रुपये खर्च करण्याचे मान्य केले आहे. त्यास मंत्रिमंडळाने देखील मान्यता दिली आहे. या उपक्रमांतर्गत 500 ईव्ही बसेस घेऊन येण्याची राज्य सरकारची योजना आहे," असे मुख्यमंत्री सावंत यांनी पीटीआयला सांगितले.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता कदंब महामंडळाकडे असलेल्या स्वतःच्या तसेच खाजगी संस्थांच्या बसेस पुरेशा नसल्याचे तुयेकर म्हणाले.

"कदंबचे पुनरुज्जीवन करणे हे स्वागतार्ह पाऊल आहे. या उपक्रमांतर्गत बसेसच्या रोल आउटवर सध्या अंतिम चर्चा सुरू आहे. एकदा आम्हाला या बस मिळाल्या की, आम्ही सध्या कार्यरत नसलेल्या मार्गांवर देखील सेवा देऊ शकू. आम्ही आंतरराज्य सेवा देखील पुन्हा सुरू करू शकतो," असे तुयेकर म्हणाले.

कदंबकडे 500 डिझेल बसेस तसेच मिशन स्मार्ट सिटी अंतर्गत दिलेल्या 48 ईव्ही बसेस आणि ऑलेक्ट्रा कंपनीकडून 54 ईव्ही बसेस खरेदी केल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ईव्ही बसेस राज्यातील रस्त्यावर धावत आहेत.

EV बसेसना कमी देखभालीची गरज असते आणि प्रवाशांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय, असे मत EV बसेसशी निगडित चालक आणि वाहकांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT