54th International Film Festival India Goa Dainik Gomantak
गोवा

54th IFFI Goa: ‘भाईजान’च्या उपस्थितीत होणार ‘इफ्फी’चे उद््घाटन

54th IFFI Goa: चंदेरी दुनियेचा महाकुंभ समजला जाणाऱ्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी अंतिम टप्प्याकडे जात असून महोत्सवाचे उद््घाटन बॉलिवूड स्टार अभिनेता ‘भाईजान’ अर्थात सलमान खान यांच्या उपस्थितीत करण्याचा तयारी सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

54th International Film Festival India Goa Opening Ceremony: चंदेरी दुनियेचा महाकुंभ समजला जाणाऱ्या भारताच्या 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) तयारी अंतिम टप्प्याकडे जात असून महोत्सवाचे उद््घाटन बॉलिवूड स्टार अभिनेता ‘भाईजान’ अर्थात सलमान खान यांच्या उपस्थितीत करण्याचा तयारी सुरू आहे.

यावेळी हॉलिवूड अभिनेता आणि निर्माते मायकल डग्लस, अभिनेत्री कॅथरिना जोन्सही उपस्थित राहणार आहे. यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण खाते, गोवा मनोरंजन सोसायटी आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) सक्रिय आहे.

याशिवाय उद््घाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह फिल्मी

सेलिब्रिटी सहभागी होतील.

राज्यात गेली 18 वर्षे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे हे 19 वे वर्ष आहे. दरवर्षीचा इफ्फी म्हणजे प्रतिनिधी, सिनेरसिक, विद्यार्थी, चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ यांना विविध अर्थाने मेजवानीच असते.

कान्स, बर्लिन यासारख्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजलेले चित्रपट, वर्ल्ड प्रीमियर होणारे चित्रपट रसिकांना अनुभवता येतात.

शिवाय मास्टर क्लास, विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चासत्रे असे अनेक कार्यक्रम असतात, पण सर्वांना उत्सुकता असते महोत्सवात हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींची.

यंदा इफ्फीचे उदघाटन सलमान खान यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे. तसे निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती आहे. याला ‘ईएसजी’च्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो यांनी दुजोरा दिला आहे. याशिवाय दक्षिणेतील एका अभिनेत्रीची चर्चा असून तीही उदघाटनाला हजर असेल.

‘मैने प्यार किया’ ते ‘टायगर-3’

57 वर्षीय सलमान खानने गेली 35 वर्षे बॉलिवूडमध्ये दबंगगिरी कायम ठेवली आहे. सलमानची सुरवात 1988 साली ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटाने झाली असली तरी त्याच वर्षी आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटाने सलमानला खऱ्या अर्थाने ब्रेक दिला.

तेव्हापासून आता येऊ घातलेल्या ‘टायगर-३’पर्यंत अनेक चित्रपटांमधून सलमानने सिनेक्षेत्रातील वर्चस्व सिद्ध केले आहे. ‘दबंग’ ‘बजरंगी भाईजान’, ‘एक था टायगर’, ‘राधे’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून सलमानने बॉलिवूडमधील स्थान कायम ठेवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

मोदी-शहांचे 'धक्कातंत्र' कायम; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नवीन यांची अनपेक्षित एन्ट्री! - संपादकीय

Goa News Live: लुथरा बंधू गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT