IFFI Golden Peacock Award Dainik Gomantak
गोवा

IFFI Golden Peacock : यंदाच्या इफ्फीत कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक'?

28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात या 15 पैकी एका सिनेमाला सुवर्ण मयुर पुरस्कार लाभणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

IFFI Golden Peacock : इफ्फीत सिनेमांच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 सिनेमांचा समावेश आहे. काश्मीर फाईल्स, द स्टोरी टेलर आणि कुरांगू पेडल हे तीन भारतीय चित्रपट त्यात समाविष्ट आहेत. 28 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या इफ्फीच्या समारोप सोहळ्यात या 15 पैकी एका सिनेमाला सुवर्ण मयुर पुरस्कार लाभणार आहे. भूमिकांसाठी, स्त्री आणि पुरुष विभागात अभिनयासाठी रौप्य मयुर पुरस्कार दिला जाणार आहे.

गोल्डन पिकॉकचे तगडे दावेदार

परफेक्ट नंबर (पोलंड- 85 मिनिटे)

आयुष्य अर्थपूर्ण कशामुळे बनते- यशामुळे की लाभणाऱ्या प्रेमामुळे? या दुविधेचा सामना, परिपूर्ण आयुष्य जगून शेवटाकडे पोहोचलेला जॉकिम आणि गणिती प्रज्ञावंत असलेला त्याचा पुतण्या डेव्हिड हे दोघेही करत आहेत. डेव्हिड त्याच्या वैज्ञानिक संशोधनात आणि अध्यापनात व्यस्त आहे. जॉकिम त्याला आपली सारी संपत्ती दान करायला पाहतो आहे पण डेव्हिड ती स्वीकारायला नकार देतो कारण गरिबीत असले तरी त्याला आपले आयुष्य आनंदात जगायचे आहे. दरम्यान डेव्हिड श्रीमंत बनला आहे अशी बातमी सगळीकडे पसरते आणि त्या तरुण संशोधकाचे पैशांसाठी अपहरण केले जाते. या सिनेमाचा आशय आणि दर्जा लक्षात घेता मला वाटते हा चित्रपट सुवर्ण मयूर पुरस्काराचा प्रबळ दावेदार आहे.

Perfect Number Movie

कोल्ड अ‍ॅस मार्बल (अझरबैजान/फ्रान्स- 88 मिनिटे)

10 वर्षाची सजा व्यतीत केल्यानंतर अकबरची जेव्हा तुरुंगातून अनपेक्षितपणे सुटका होते तेव्हा त्याच्या मुलाला आपल्या बापाने आईचा खून का केला होता हे शोधून काढावेसे वाटते. दुसरीकडे, अकबर मात्र आपल्या मुलाचे जीवन चांगले बनावे यासाठी साऱ्या मार्गाने झटत असतो. एक यशस्वी कलाकार आणि त्याची प्रेयसी यांच्यामधल्या मिश्र नात्यासंबंधात ‘कोल्ड अ‍ॅस मार्बल’ हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाचा नायक गुर्बन इस्मायलोव्ह याने त्याच्या भूमिकेत गहिरे रंग भरले आहेत. त्याच्या भूमिकेमुळे रौप्य पदकावर (पुरुष भूमिकेसाठी) तो आपला दावा मजबूत बनवून आहे.

Cold As Marble

दि लाईन (फ्रान्स/बेल्जियम/स्वित्झर्लंड- 102 मिनिटे)

बालिश आणि गुलछबू वृत्तीची क्रिस्टीना तीन मुलींची आई आहे. त्या तीन मुलींपैकी मार्गारेटचा आईबरोबर हिंसक वाद होतो. आई राहत असलेल्या घरापाशी 100 मीटर पेक्षा कमी अंतरावर जाण्यास मनाई करणारा प्रतिबंध, शिक्षेच्या रूपाने तिच्यावर लादण्यात येतो. क्रिस्टीना आपल्या घराभोवती 100 मीटर व्यासाची गोलाकार रेखा आखून घेते. ही रेखा, मार्गारेटची आपल्या कुटुंबाची जवळीक साधण्याची इच्छा अधिकच प्रबळ करते. दररोज या रेषेपाशी येण्याचा मार्गारेटचा हट्टीपणा या संघर्षात अधिकच गडदपणा निर्माण करतो. या चित्रपटातील मुख्य भूमिकेत असणाऱ्या स्टेफनी ब्लैंकचौड हिचा अभिनय फार प्रभावी झाला आहे. उत्कृष्ट भूमिकेसाठी ती रौप्य मयूर (स्त्री भूमिका) पटकावू शकते.

The Line
The Storyteller

दि स्टोरी टेलर (भारत- 117 मिनिटे)

तारिणी रंजन बंडोपाध्याय हा एक आवारा स्वभावाचा गोष्टीवेल्हाळ माणूस आहे. एका जागी चिकटून राहणे त्याला शक्य होत नाही. आतापर्यंत त्याने आपल्या आयुष्यात 32 नोकऱ्या बदलल्या आहेत. वयाच्या 60 व्या वर्षी कलकत्त्यात निवृत्त झाल्यानंतर आता त्याच्या मनात एकच खंत उरली आहे ती म्हणजे आपल्या दिवंगत पत्नीला तो कधीच सुट्टीवर घेऊन जाऊ शकला नाही, ज्याची आस पत्नीने नेहमीच बाळगली होती. आता अचानक त्याच्यापाशी भरपूर वेळ आहे पण जवळ मात्र कोणीच नाही. हा एक सुंदर चित्रपट आहे. या चित्रपटाला परीक्षकांचे विशेष पारितोषिक लाभू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT