IFFESTA at 55th IFFI Goa Dainik Gomantak
गोवा

IFFI Goa 2024: यंदाच्या इफ्फीत खास कार्यक्रमाचे आयोजन; 'इफ्फीएस्टा' करणार उपस्थितांचे मनरिजवण

IFFESTA Program at Panjim: कला अकादमीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात संगीतप्रेमींना एक अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळेल

Akshata Chhatre

पणजी: राज्यात सध्या इफ्फीच्या उद्घटनाची सगळेच सिनेमाप्रेमी अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. बुधवारी संध्याकाळी 5-5:30च्या सुमारास इफ्फीचे उद्घाटन होईल आणि यानंतर सलग आठ दिवसांसाठी आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव देश-विदेशातील चित्रपट प्रेमींसाठी खुला असेल. यंदाचा हा चित्रपट महोत्सव सोहळा बराच आकर्षक आणि खास होणार असून यंदाच्या वर्षी इफ्फीमध्ये इफ्फीएस्टा हा कार्यक्रम देखील सादर केला जाणार आहे.

इफ्फीएस्टाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि करमणूक यांचे संमिश्रण पाहायला मिळेल, तसेच या कार्यक्रमाचा भाग बनून प्रेक्षक सिनेमा आणि संगीत यांची आगळीवेळी मजा लुटू शकणार आहेत.

कला अकादमीमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात संगीतप्रेमींना एक अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळेल. या महोत्सवात देशभरातून येणाऱ्या कलाकारांचे प्रादेशिक, पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत, यामधून भारताची सांस्कृतिक विविधता आंतराष्ट्रीय स्थरावर सदर होईल. 2004 पासून इफ्फी आणि गोव्याचं नातं बरंच पक्कं झालंय आणि यंदाच्यावर्षी देखील मोठया प्रमाणात प्रेक्षक या चित्रपट महोत्सवाला भेट देतील अशा चर्चा केल्या जातायत.

तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही..

इफ्फीच्या आयोजकांकडून विविध भागांमधून येणाऱ्या डेलिगेट्ससाठी एक खास आणि मोठी घोषणा करण्यात आलीये. तुम्हाला जर का एखाद्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करू शकता. आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षक इफ्फीच्या वेबसाईटवरून किंवा मोबाईल ऍपवरून चित्रपटांचं बुकिंग करू शकतील, मात्र यासाठी तुम्हाला किमान एक दिवस आधी बुकिंग करणं अनिवार्य असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

देशातील करोडो नोकरदारांसाठी मोठी बातमी! EPFO लवकरच सुरु करणार व्हॉट्सॲप सर्व्हिस; आता एका 'हॅलो'वर मिळणार पीएफ बॅलन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती

SCROLL FOR NEXT