IFIF 2025 parade  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: इफ्फी परेडची रंगीत तालीम अन् वाहतुकीचा बट्ट्याबोळ! 3 तास वाहनचालकांची परवड; बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप

IFFI 2025 Parade: जागोजागी पोलिसांचे गट बंदोबस्तासाठी तैनात केले होते. त्यामुळे बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. इफ्फीनिमित्त आयनॉक्ससमोरील रेड कार्पेटसाठी खास पूल उभारला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्या (ता. २०) सुरुवात होणार आहे. या महोत्सवाचे उदघाटन खुल्या वातावरणात ‘इफ्फी परेड’ने होईल. त्यासाठी मंगळवारी या परेडची रंगीत तालीम दयानंद बांदोडकर मार्गावर घेण्यात आली. दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत बांदोडकर मार्ग जुन्या सचिवालयापासून मिरामारपर्यंत बंद ठेवला होता.

यावेळी जागोजागी पोलिसांचे गट बंदोबस्तासाठी तैनात केले होते. त्यामुळे बांदोडकर मार्गाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. इफ्फीनिमित्त आयनॉक्ससमोरील रेड कार्पेटसाठी खास पूल उभारला आहे.

जेणेकरून आयनॉक्स परिसरात फिरणाऱ्या लोकांना रेड कार्पेटवर येणाऱ्या अभिनेत्यांच्या भेटीवेळी थांबावे लागणार नाही. मांडवी किनारी पदपथावर स्टॉल्सचीही उभारणी केली असून, त्यातील बहुसंख्य स्टॉल्स स्वयंसाहाय्य गटांना वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आणि कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

इफ्फीच्या उद्‍घाटनप्रसंगी २० रोजी कला अकादमी ते दिवजा सर्कल हा रस्ता दुपारी ३ वाजता पूर्णपणे बंद केला जाईल. दुपारी ४ ते ७ यावेळेत जुन्या सचिवालयाकडून बाल भवन ते मिरामारकडे जाणारा मार्ग चित्ररथ परेडमुळे वाहनांसाठी पूर्णपणे बंद असेल,

असे पोलिस निरीक्षक सीताकांत नायक यांनी सांगितले. पणजीबाहेर जाणारी वाहने कांपाल बाल गणेश - कला अकादमीकडून सांतिनेज जंक्शन तेथून १८ जून मार्गे चर्च स्क्वेअर आणि जुन्या पाटो पुलावरून वाहने बाहेर पडतील.

त्याशिवाय यादिवशी सकाळी ७ ते १० यावेळेत पणजी शहरात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल. तसेच पणजीहून रायबंदरकडे जाणारी वाहने ही दिवजा सर्कल, मेरशी सर्कल बायपासमार्गे जातील. याशिवाय जोस फाल्कांव रोड, ज्यो कास्ट्रो रोड, कासा इंटरनॅशनल, काकुलो आयलॅण्ड ते सांतिनेज जंक्शन, चर्च चौक ते कोर्तीन, डाऊन द रोड पब ते मॅच कॉर्नर हा भाग गुरुवारी ‘नो पार्किंग झोन’ असेल, असे त्यांनी नमूद केले.

विद्युत रोषणाईने झळाळला परिसर

इफ्फीचा उद्‍घाटन सोहळा बांदोडकर मार्गावर होणार असल्याने हा मार्ग विद्युत रोषणाई आणि रंगरंगोटीने सजविला आहे. रस्ता दुभाजकावर, वृक्षांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. आज इफ्फी परेडमध्ये सहभागी होणाऱ्या पारंपरिक रोमटामेळ संघाने तालीम केली. उद्‍घाटनाच्या दिवशी या चित्ररथांचा समावेश असणार आहे. इफ्फीसाठी आयनॉक्स, जुने गोमेकॉ, मनोरंजन संस्थेचे कार्यालय असा सर्व परिसर सजावटीने झळाळून निघाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पुरे झाली आता आश्‍‍वासने; भंगारअड्ड्यांसाठी धोरण ठरवा - संपादकीय

Dhargal: धारगळच्या आयुर्वेद संस्थेची सेवा, शिक्षण, संशोधन क्षेत्रात झेप; 5.25 लाखांहून अधिक रुग्णसेवा, 40 हजार आरोग्य शिबिरे

Goa Winter Update: राज्यात हुडहुडी भरविणारी थंडी, पारा घसरला 17.5 अंशांवर

Verna: व्‍यावसायिक वादातून भंगारअड्ड्याला आग, बेकायदा आस्‍थापनांना अभय का? केळशी परिसरात धुराचा प्रचंड त्रास

Goa Nightclub Fire: बोगस कागदपत्रांद्वारे परवाने दिले कसे? समितीतर्फे तपास सुरू; लुथरा बंधूंचे मंगळवारी भारतात प्रत्यार्पण शक्य

SCROLL FOR NEXT