IFFI 2025 Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: 'इफ्फी' परेडमुळे पणजीत अर्धा दिवस सुट्टी! सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्था दुपारनंतर बंद

IFFI 2025 Panaji holiday: पणजी शहर मर्यादेतील सर्व सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्थांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे

Akshata Chhatre

पणजी: गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (IFFI) ५६ व्या आवृत्तीच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उद्घाटनाच्या दिवशी, म्हणजेच गुरुवारी (दि.२०) पणजी शहर मर्यादेतील सर्व सरकारी कार्यालये आणि स्वायत्त संस्थांना दुपारनंतर अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

परेडसाठी विशेष व्यवस्था

सामान्य प्रशासनाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. यावर्षी इफ्फीचा उद्घाटन सोहळा दरवर्षीप्रमाणे बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर न होता, तो पणजीतील जुन्या गोमेकॉ (Old GMC) इमारतीच्या समोर होणार आहे. या दिवशी भव्य परेडचेही आयोजन करण्यात आले आहे.

वाहतूक आणि सुरक्षेसाठी निर्णय

या सुट्टीमागचे कारण स्पष्ट करताना सरकारने सांगितले की, २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन परेडमुळे सामान्य जनतेची गैरसोय टाळण्यासाठी, पणजी शहरात होणारी वाहतूक कोंडीमी करण्यासाठी आणि परेड व सुरक्षा व्यवस्थेचे सुरळीत आयोजन सुनिश्चित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पणजीतील सरकारी कर्मचारी आणि स्वायत्त संस्थांमधील कर्मचाऱ्यांना इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याचा उत्साह अनुभवता येईल.

गोव्यातील चित्रपटांना विशेष संधी

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, यंदा महोत्सवात 'क्लाउडिया' आणि 'द पायलट' हे गोवन चित्रपट प्रदर्शित केले जातील. याशिवाय, स्थानिक चित्रपटांसाठी असलेल्या विशेष विभागात आणखी पाच गोव्यातील चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT