IFFI Delegate Registration Process  Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: गोव्यात होणाऱ्या 56व्या 'इफ्फी'साठी प्रतिनिधी नोंदणी सुरु, चित्रपटप्रेमींसाठी सुवर्णसंधी; जाणून घ्या प्रवेश शुल्कासह डिटेल्स

IIFFI Delegate Registration: गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) साठी प्रतिनिधींची (Delegates) नोंदणी सुरु झाली आहे.

Manish Jadhav

पणजी: गोव्यात येत्या 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) साठी प्रतिनिधींची (Delegates) नोंदणी सुरु झाली आहे. चित्रपटप्रेमी आणि व्यावसायिकांना आता अधिकृत संकेतस्थळ iffigoa.org वरुन नोंदणी करता येणार आहे. भारतीय आणि जागतिक सिनेमाचा हा महाकुंभ अनुभवण्याची संधी या महोत्सवातून मिळणार आहे.

प्रतिनिधींसाठी प्रवेश आणि शुल्क

दरम्यान, या महोत्सवात सहभागी होणाऱ्या चित्रपट (Moive) व्यावसायिक आणि सिनेप्रेमींसाठी प्रति व्यक्ती 1180 (जीएसटीसह) शुल्क ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी ही प्रतिनिधी नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे. यामुळे मोठ्या संख्येने तरुण पिढीला या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा आहे. नोंदणी शुल्क भरुन किंवा शुल्क न भरता नोंदणी करणाऱ्या सर्व प्रतिनिधींना ऑनलाइन तिकीट काढून चित्रपट पाहता येणार आहेत.

विविध चित्रपटांची मेजवानी

56व्या 'इफ्फी'मध्ये जगभरातील सिनेमाची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या महोत्सवात 105 देशांमधील 270 हून अधिक चित्रपटांचे प्रदर्शन केले जाईल. यासोबतच, 'इंडियन पॅनोरमा' विभागात निवड झालेल्या 25 वैशिष्ट्यपूर्ण (Feature) आणि 20 गैर-वैशिष्ट्यपूर्ण (Non-Feature) भारतीय चित्रपटांचाही यात समावेश असेल. चित्रपटसृष्टीतील सर्व क्षेत्रांतील प्रतिनिधींना जगभरातील नवीन आणि उत्कृष्ट सिनेमा पाहता येणार आहे.

एनएफडीसी फिल्म बाजारसाठीही नोंदणी सुरु

'इफ्फी'सोबतच, 19व्या एनएफडीसी फिल्म बाजारचीही नोंदणी सुरु झाली आहे. 20 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. 'फिल्म बाजार' हे चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वितरक आणि गुंतवणूकदार (Investors) यांना एकत्र आणणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. यावर्षी 'व्ह्यूइंग रुम 2025' (Viewing Room 2025) हे एक नवीन आकर्षण असणार आहे, जे निवडक फिल्म प्रोजेक्ट आणि सहकार्यांसाठी एक विशेष व्यासपीठ उपलब्ध करुन देईल.

दरम्यान, या महोत्सवांमुळे भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर एक नवीन ओळख मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 'इफ्फी' आणि 'फिल्म बाजार' हे केवळ चित्रपट पाहण्याचे कार्यक्रम नसून ते नवीन प्रतिभांना प्रोत्साहन देणारे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट उद्योगाला चालना देणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Literacy: साक्षरतेत गोवा देशात प्रथम, दर 99.72 टक्‍के : केंद्रीय शिक्षण राज्‍यमंत्र्यांची माहिती

New Zuari Bridge: 'झुआरी'वरील मनोऱ्याचे काम 2031 पर्यंत पूर्ण, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती

Arpora Nightclub Fire: क्लबच्या तीन कर्मचाऱ्यांच्या जामिनावरील सुनावणी तहकूब, अंतरिम जामिनावर मंगळवारी, तर मुख्य अर्जावर 28 रोजी सुनावणी

क्रीडा विश्वात खळबळ! वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या दिग्गज क्रिकेटपटूला होणार अटक, नेमकं प्रकरण काय?

Yamuna Expressway Accident: यमुना एक्सप्रेसवेवर थरार! दाट धुक्यामुळे आठ बस आणि तीन कारची टक्कर; 4 जणांचा मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT