गोव्यात IFFI होतो, सेरेंडिपीटी होतो परंतु त्यात स्थानिक कलाकार किती असतात? ‘सडेतोड नायक’मध्‍ये खंत

Sadetod Nayak: महोत्सवात स्थानिक साहित्याला जे व्यासपीठ मिळायला हवे तेही मिळत नाही, अशी खंत पत्रकार तथा साहित्यिक रिको नोरोन्हा यांनी व्यक्त केली.

पणजी: राज्यात काही दिवसांपूर्वी गोवा कला आणि साहित्य महोत्सव (गाल्फ) साजरा करण्यात आला; परंतु या महोत्सवात सातत्याने तेच तेच साहित्यिक चेहरे दिसत आहेत, नवे कुणी दिसत नाहीत. या महोत्सवात स्थानिक साहित्याला जे व्यासपीठ मिळायला हवे तेही मिळत नाही, अशी खंत पत्रकार तथा साहित्यिक रिको नोरोन्हा यांनी व्यक्त केली.

गोमन्तक टिव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात साहित्यिक मधुसुदन जोशी आणि युगांक नायक यांनी सहभाग घेतला होता. नोरोन्हा म्हणाले की, गोवा कला आणि साहित्य महोत्सवाच्या आयोजकांशी किंवा सहभागी होणाऱ्यांशी माझे काही वैयक्तिक वैर नाही.

किंबहुना मला या महोत्सवात जेवढ्या वेळा बोलवायला हवे होते, त्यापेक्षा अधिकच वेळा मला बोलावण्यात आले आहे. परंतु आम्ही जर आमच्या स्थानिक, प्रादेशिक साहित्याला व्यासपीठ मिळवून दिले नाही तर दुसरे कोण मिळवून देणार? गोव्यातील मराठी, कोकणी किंवा इतर कोणत्याही भाषेतील साहित्य असो ते या महोत्सवातून दिसणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कंपूशाहीचा भरणा वाढला

साहित्य चवळळींमध्ये कंपूशाहीचा भरणा वाढत आहे. नवसर्जनाच्या या साहित्याच्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींचा भरणाही वाढला आहे. आजच्या काळातील विद्यार्थी, युवक हे साहित्य संमेलनातून परिषदांच्या माध्यमातून साहित्य क्षेत्राकडे वळतील या विचार कालबाह्य झाला आहे. सद्यस्थिती उत्तम दर्जाची मासिके येणे गरजेचे असून वाचक चळवळीला बळकटी देणे गरजेचे असल्याचे मत युगांक नायक यांनी व्यक्त केले.

डबकी घेऊन बसलोय!

मी गाल्फमध्ये काहीवेळा सहभागी झालोय, आयोजनातही माझा सहभाग होता. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होतो; सेरेंडिपीटी महोत्सव होतो; परंतु त्यात स्थानिक कलाकार किती असतात? या महोत्सवांचा लाभ स्थानिकांना किती होतो? गोव्यातील साहित्यिक कार्याविषयी बोलायचे झाल्यास आज आम्ही स्वतःची ठराविक डबकी घेऊन बसलोय. आजची साहित्यिक चळवळ पाहता, प्रामुख्याने प्रस्थापितवादाकडे वळत असल्याचे दिसत असल्याचे मत युगांक नायक यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com