Rajinikanth, Cm Pramod Sawant, Ranvir Kapoor Dainik Gomantak
गोवा

IFFI 2025: '..पुन्हा अभिनेता म्हणून जन्म मिळावा'! सुपरस्टार 'रजनीकांत' यांच्या चाहत्यांचा जल्लोष; जीवनगौरव स्वीकारल्यावर व्यक्त केल्या भावना

Rajinikanth IFFI Goa 2025: व्हिएतनाममधील हा चित्रपट १९९० च्या दशकातील एका ‘ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर’ आणि एका ‘केज फायटर’ यांच्यातील अस्थिर प्रेमकथेला केंद्रस्थानी ठेवतो.

Sameer Panditrao

पणजी: तृतीयपंथीय व्यक्तींच्या जीवनात शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या कराव्या लागणाऱ्या संघर्षावर आधारीत दिग्दर्शक ॲश्ली मेफेयर यांनी साकारलेल्या ‘स्कीन ऑफ युथ’ ने यंदाच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुवर्ण मयूर पटकाविला.

व्हिएतनाममधील हा चित्रपट १९९० च्या दशकातील एका ‘ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर’ आणि एका ‘केज फायटर’ यांच्यातील अस्थिर प्रेमकथेला केंद्रस्थानी ठेवतो. मानवता आणि स्वातंत्र्याच्या सीमांचा शोध घेणारी ही एक वादळी प्रेमकथा असून ज्युरींनी ती भावली. आंतराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या मराठी चित्रपट ‘गोंधळ’ नेही छाप सोडली. चित्रपटाच्या उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी संतोष डावखर यांना राैप्य मयूर प्राप्त झाला.

दरम्यान, श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीयमंत्री एल.मुरूगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जीवन पुरस्कार प्राप्त अभिनेते रजनीकांत, रणवीर सिंह, ऋषभ शेट्टी, रवी किशन, शेखर कपूर, किशोर कदम, रमेश सिप्पी, डॉ. किरण शांताराम, नवाजुद्दीन सिद्दीकी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दिलायला लोबो, चंद्रकांत शेट्ये यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

गोवा चित्रपट निर्मितीचे जागतिक केंद्र बनणार : मुख्यमंत्री प्रमाेद सावंत

गोवा हे चित्रपट निर्मिती आणि कलाक्षेत्रातील प्रतिभांसाठी जागतिक दर्जाचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून गोवा तरुण कलाकारांना प्रशिक्षण देणारे आणि त्यांना घडविणारे एक सक्षम केंद्र बनवण्याचा मानस आहे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोव्याने इफ्फीला एक महत्त्वाचे जागतिक सांस्कृतिक चिन्ह म्हणून जोपासले आहे. येथे कल्पना विकसित होतात, कलात्मक देवाणघेवाण फुलते आणि सर्जनशीलतेला नवी ऊर्जा मिळते. गोवा जागतिक चित्रपट विश्वात उदयाला येत असून भविष्यातही या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुन्हा अभिनेता म्हणून जन्म हवा : रजनीकांत

रजनीकांत माझ्या अभिनयाच्या कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाली असली तरी देखील मला १० ते १५ वर्षे झाल्यासारखे वाटत आहे; कारण माझे सिनेमा आणि अभिनयावर अतिशय प्रेम आहे. मला जरी शंभर जन्म मिळाले तरी अभिनेता म्हणून जन्म मिळावा, अशी इच्छा आहे. माझ्या कार्याचा गौरव केल्याबद्दल मी केंद्र सरकार आणि गोवा सरकारचा आभारी आहे, अशा भावना ‘सुपरस्टार’ रजनीकांत यांनी व्यक्त केल्या. रजनीकांत यांचे व्यासपीठावर आगमन होता च चाहत्यांनी जल्लोष त्यांचे स्वागत केले. जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी रजनीकांत हे पारंपरिक तमिळ वेषात दाखल झाले होते.

थोडक्यात पुरस्कार असे :

  सुवर्ण मयूर स्कीन ऑफ युथ

 सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार रजनीकांत

 उत्कृष्ट दिग्दर्शक संतोष डावखर (गोंधळ)

 उत्कृष्ट अभिनेता उबेमार रियॉब (ए पोयट)

 उत्कृष्ट अभिनेत्री झारा सोफिया ओस्तान (लिटल ट्रबल गर्ल)

 स्पेशल ज्युरी अवार्ड आकिनोला डेविस जेआर

 युनेस्को गांधी मेडल सेफ हाऊस (दिग्दर्शक एरिक सेवनसन)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hadkolan Goa: रेड्यांच्या जत्रेसाठी सुप्रसिद्ध असलेले, निसर्ग सौंदर्याने सजलेलले गाव 'अडकोळण'

Iran America Tension: "ट्रम्प इराणचे गुन्हेगार...!", खामेनेई यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षावर ठेवला विध्वंसाचा ठपका; जागतिक राजकारणात पुन्हा खळबळ

Goa Crime: आधी प्रेम, मग अनन्वित अत्याचार अन् शेवटी गळा चिरला, रशियन सिरीयल किलरच्या क्रूरतेनं हादरला गोवा; लवकरच उलघडणार 10 तरुणींच्या मृत्यूचं गूढ?

Congress MLA: "सुंदर मुलगी दिसली की मन भटकतं अन् अत्याचर होतो..." काँग्रेस आमदारानं तोडले अकलेचे तारे; घृणास्पद वक्तव्यावर भाजप आक्रमक VIDEO

अँड्रॉइड स्मार्टफोन युझर्ससाठी धोक्याची घंटा! डॉल्बी ऑडिओमधील तांत्रिक बिघाडानं उडाली खळबळ; केंद्र सरकारकडून नवीन चेतावणी जारी

SCROLL FOR NEXT