Himachal Police Band at IFFI 2023 google image
गोवा

IFFI 2023: 'इफ्फी'मध्ये हिमाचल प्रदेशचे पोलिस सादर करणार 'हार्मनी ऑफ द पाइन्स', देशातील पहिलाच बँड

26 नोव्हेंबरला पोलिस बँड पथक गोव्याकडे रवाना होणार

Akshay Nirmale

IFFI 2023: गोव्यात सोमवारपासून ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरूवात झाली आहे. यंदाच्या 'इफ्फी' काही खास गोष्टीही आहेत. त्यापैकी एक म्हणजे आता हिमाचल प्रदेश पोलिसांच्या बँडतर्फे येथे एक कार्यक्रम होणार आहे.

इफ्फीच्या समारोप सोहळ्यावेळी हिमाचल प्रदेशचे पोलिस ऑर्केस्ट्रा हार्मनी ऑफ द पाईन्स सादर करणार आहेत. या पोलिस बँडमधील पोलिस कर्मचारी त्यासाठी कसून सराव करत आहेत.

दरम्यान, यानिमित्ताने भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सादरीकरणासाठी प्रथमच एका पोलिस बँडची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश पोलिसांसाठी हा अभिमानाची बाब आहे.

पोलिस निरीक्षक विजय कुमार यांच्या नेतृत्वाखालील हिमाचल प्रदेश पोलिस बँडचे हे पथक 26 नोव्हेंबरला गोव्याला रवाना होणार आहे. २८ नोव्हेंबर रोजी इफ्फीचा समारोप आहे. या समारंभातील पोलिसांच्या या सादरीकरणाची सर्वांनाच उत्सुकता आहे.

इन्स्पेक्टर विजय कुमार यांनी हिंदी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, आमच्या बँडने 'तिरंगा' हे गाणे या खास सादरीकरणासाठी निवडले आहे.

कैवल्य शाह यांनी हे गाणे लिहिले आहे. तर गुरू शर्मा यांनी संगीतबद्ध केले आहे. तिरंगा गाण्याचे दिग्दर्शक राजीव जामवाल आहेत. ते पालमपूर येथील आहेत

लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या बॅनरखाली मुंबईत हे गाणे रेकॉर्ड केले आहे. आम्हाला देखील या सादरीकरणाची खूप उत्सुकता आहे. इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कला सादर करण्याची संधी मिळणे आनंददायी आहे.

विजयकुमार यांनी हिमाचल प्रदेशच्या जनतेसह राज्याचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू, डीजीपी आणि सर्व पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT