Nawazuddin Siddiqui: Dainik Gomantak
गोवा

Nawazuddin Siddiqui: 'इफ्फी'मध्ये अयोग्य लोकांना बोलवू नका; कलात्मक चित्रपट बनवणाऱ्यांना आमंत्रण द्या!

IFFI 2023 च्या फिल्म बाजारमध्ये अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकीने मांडले मत

Akshay Nirmale

Nawazuddin Siddiqui in IFFI 2023: गोव्यात 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्यावर आला आला आहे. काही दिवसांपुर्वीच या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात निर्माता-दिग्दर्शक करन जोहरला पहिल्या रांगेत बसवल्यावरून ज्युरींनी टीका केली होती.

त्यानंतर आता अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी यानेही 'इफ्फी'मध्ये अयोग्य लोकांना आमंत्रित करू नका, असे आवाहन केले आहे.

नवाझच्या या आवाहनानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नवाझुद्दिन इफ्फीमध्ये गुरूवारी फिल्म बाजार येथे आला होता. येथे त्याने त्याच्या चित्रपट कारकिर्दीचा प्रवास आणि विविध भूमिकांची तयारी कशी केली, याचा पट उलगडला.

येथे बोलताना बिगर-कलात्मक चित्रपट निर्माते इफ्फीमध्ये हजेरी लावण्यास पात्र आहेत का? असा सवाल केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना नवाझने, अपात्र लोकांना इफ्फीसाठी आमंत्रित केले जाऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले.

नवाझ म्हणाला की, “जे लोक कलात्मक चित्रपट बनवतात त्यांना आमंत्रित केले पाहिजे. असे चित्रपट बनवणारे लोक महत्त्वाचे आहेत. आणि त्यांच्यासाठी असे महोत्सव महत्वाचे असतात. ते अशा महोत्सवांना महत्व देतात.

असे अनेक चित्रपट निर्माते आहेत ज्यांना चांगला सिनेमा बनवायचा आहे. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले पाहिजे.”

काही दिवसांपुर्वी इफ्फीतील भारतीय पॅनोरमा नॉन-फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष असलेले अरविंद सिन्हा म्हणाले यांनी बॉलीवूड चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यांच्यासारख्यांना इफ्फीच्या उद्घाटन समारंभात अजिबात प्रवेश देऊ नये.

पुढच्या रांगेतील जागा तर अजिबात देऊ नये, असे म्हटेल होते. ते बॉलीवूड आहे. ते वेगळे आहेत. त्यांचा सिनेमाशी काय संबंध? असा सवाल सिन्हा यांनी केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT