Goa: sudin Dhavalikar
Goa: sudin Dhavalikar Gomantak
गोवा

Goa: हिंमत असेल, तर माकडउड्या मारलेल्यांना हाकला!

Sanjay Ghugretkar

फोंडा ः इकडून तिकडे उड्या मारलेल्या लोकांकडूनच पक्षांतरबंदी कायदा आणण्यासाठी ठराव घेण्याची भाषा बोलली जात असून यासंबंधीचा कायदा होण्यास वेळ तर लागेलच, मात्र तुम्हाला आमदार म्हणून निवडून येऊन पक्षांतर केलेल्यासंबंधी चीड असेल तर आधी माकडउड्या मारलेल्यांना या निवडणुकीत तिकीट देऊ नका. आपल्या पक्षासाठी जीवतोड मेहनत केलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट द्या आणि माकडउड्या मारून स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षाचा गळा घोटून दुसऱ्या पक्षात गेलेल्यांना खुर्चीवर नव्हे तर जमिनीवर जागा द्या, त्यांना मतदारांची माफी मागायला लावा असे परखड उद्‌गार मगो पक्षाचे नेते तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी काढले. मडकई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सुदिन ढवळीकर यांनी पक्षांतर करण्यासाठी माकडउड्या मारलेल्या आमदारांवर जोरदार ताशेरे ओढले. यावेळी आमदार सुदिन ढवळीकर यांच्यासमवेत जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, सरपंच लक्ष्मी वळवईकर, सरोजा नाईक, पंचसदस्य शैलेंद्र पणजीकर, वामन नाईक व विशांत नाईक आदी उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले, राजकारण शुद्ध होण्यासाठी माकडउड्या मारलेल्या सर्व आमदारांना आता तिकीट नव्हे तर घरी बसवण्याची वेळ आहे. यासंबंधी (Goa politics) राजकीय पक्षांना चाड असेल तर एकत्रित बसून यावर निर्णय घेऊया, आपण यासंबंधी चर्चा करून निर्णय घेण्यास तयार आहे, असेही सुदिन ढवळीकर म्हणाले. आम आदमी पक्षाकडून आमच्या पक्षातील संभाव्य उमेदवारांना आपल्याकडे ओढण्याची तयारी चालली होती, त्यासंंबंधी मगोतीलच एका निष्ठावंत कार्यकर्त्याने आपच्या पदाधिकाऱ्यांना असे करणे गैर असल्याचे सांगून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही स्वतः चर्चा करा, असे सांगितल्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्याला भेटण्यास बोलावले, त्यामुळेच आम्ही गेलो, असे स्पष्टीकरण ढवळीकर यांनी दिले. विद्यमान भाजप सरकार भ्रष्ट आहे. कोविड (covid19) काळात लोकांची थट्टा या सरकारने केली. सरकारने नेमलेल्या प्रत्येक आयोगाचे अध्यक्ष पक्षासाठी काम करण्यासाठी फिरत आहेत, हे चुकीचे असून आयोगाचे अध्यक्ष हे निष्पक्षपाती असायला हवे, पण इथे तर आयोगाचे अध्यक्षच प्रचार करण्यासाठी फिरत आहेत, असे नरेंद्र सावईकर यांचे नाव घेऊन सुदिन ढवळीकर यांनी सांगितले. महिला आयोगाचीही तीच स्थिती असल्याचे सांगून नूतन राज्यपालांच्या भेटीवेळी आपण यावर बोलणार असल्याचे सांगून राजकीय माकडउड्यासंबंधी आपण पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना यासंबंधी कळवणार असल्याचेही ढवळीकर म्हणाले.

फोंड्यातील मगोचे माजी आमदार लवू मामलेदार (lavu mamlekar) यांनी आपल्यावर आरोप केले, त्यासंबंधी काय, असे विचारल्यावर प्रत्येकाला आपण ज्या पक्षातून निवडून आलो, त्या पक्षाबद्दल आदर आणि अभिमान असायला हवा, असे सांगून आपण कुणावर टीका करीत नाही, पण आपण जर पैसे खाल्ले किंवा गोलमाल केला असा जर आरोप करायचा असेल तर तो सप्रमाण सिद्ध करा, असे आव्हान देऊन उच्च न्यायालयाने योग्य न्याय दिल्याचे सुदिन ढवळीकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT