Goa: राष्ट्रीय महामार्गाविषयी प्रमोद सावंत यांची नितीन गडकरींशी चर्चा

मुख्यमंत्री (Cm) उपमुख्यमंत्री(Deputy cm) साबांखा मंत्र्यांसह मान्यवर दिल्लीत(Delhi) दाखल
Goa cm visit delhi
Goa cm visit delhiCm meet Gadkari
Published on
Updated on

पणजी : राज्यातील विविध प्रकल्पांच्या विषयासंदर्भात (Goa state project) केंद्राशी (Central gov) चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (cm pramod sawant) आज (रविवारी) दुपारी दिल्लीला (Delhi) रवाना झाले. रविवारी ते केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भेटले.(Nitin Gadkari) राज्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच नव्या झुआरी पुलाच्या बांधकामासंदर्भात मुख्यमंत्री सावंत यांनी गडकरी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर (Babu Kavalekar) हेही होते.दिल्ली दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री सावंत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) पत्रकारांना ही माहिती दिली. दिल्लीला गेलेल्यांमध्ये उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, (Milind Naik) सभापती राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) तसेच बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर (Dipak Pauskar) यांचा समावेश आहे.

Goa cm visit delhi
Goa: पर्ये सत्तरीत जलकुंभाचे भूमीपूजन

या मुद्द्यांवर होणार चर्चा : मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, नगरविकासमंत्री तसेच सभापती हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) तसेच केंद्रीय आदिवासी व्यवहारमंत्री अर्जुन मुंडा (Arjun Munda) यांची सोमवारी भेट घेऊन धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी करण्यात येणार आहे. राज्यात सुरू असलेल्या महामार्गाच्या कामांमुळे अनेक ठिकाणी समस्या उद्‍भवत आहेत व त्याला सरकारला तोंड द्यावे लागत आहे. ही कामे करताना महामार्गाचे अधिकारी राज्य सरकारला विश्‍वासात घेत नसल्याने रस्त्याच्या बाजूने असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होत आहे. या महामार्गाच्या कामामुळे राज्यातील रस्त्यांची दैना झाली आहे. एका बाजूने रस्त्यांची कामे सुरू आहेत तर दुसऱ्या बाजूने मुसळधार पावसामुळे या महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. (Heavy Rain) त्यामुळे यासंदर्भात मुख्यमंत्री चर्चा करण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com