Arvind Kejriwal in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात पूर्ण बहुमत न मिळाल्यास..: अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मतदारांना येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला (AAP) संधी देण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात निवडणूक प्रचाराने जोर धरला आहे. विविध राजकीय पक्षांचे मोठे नेते सध्या गोव्यात तळ ठोकून बसले आहेत. आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवल शनिवार रविवार दोन दिवसाच्या गोव्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी लोकांची भेट घेतली आणि पक्षाचा प्रचार केला. यावेळेस त्यांनी भाजप विरोधी युती बद्दल एक सूचक विधान केले.

14 फेब्रुवारीच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट जनादेश न मिळाल्यास आप सरकार स्थापन करण्यासाठी भाजप विरोधी पक्षाबरोबर युती करण्याचा विचार करेल, असे अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी सांगितले.

मात्र हे बोलताना त्यांनी निवडणुकांच्या (Election) आधी कुठल्याही पक्षाबरोबर युती करणार नसल्याचे स्पष्ट केले. आप स्वबळावर गोवा विधानसभा निवडणूक लढवेल, असे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल यांनी मतदारांना येत्या गोवा विधानसभा निवडणुकीत 'आप'ला (AAP) संधी देण्याचे आवाहन केले. दौऱ्यादरम्यान त्यांनी आश्वासनांचा पाढा वाचून दाखवला. "बदलासाठी मतदान करण्यासाठी लोक उत्साही आहेत. भाजप आणि काँग्रेसने या लोकांसाठी काहीही केले नाही. तरुण घरी बसले आहेत कारण त्यांच्याकडे नोकऱ्या नाहीत. बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे," केजरीवाल म्हणाले.

ते पुढे म्हणाले, "गोव्यात 'आप'चे सरकार आले तर पर्यटन क्षेत्र विकसित केले जाईल. गोव्यात 24 तास मोफत वीज आणि पाणी दिले जाईल. रस्ते सुधारले जातील आणि सर्व सरकारी शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाईल. उत्तम आणि मोफत आरोग्य सेवेसाठी गोव्यातील प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात मोहल्ला दवाखाने आणि रुग्णालये उघडली जातील. शेतकरी वर्गाशी चर्चा करून शेतीचे प्रश्न सोडवले जातील. व्यापार व्यवस्था सुव्यवस्थित आणि सरलीकृत केली जाईल."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT