पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (GMC) 200 हून अधिक डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. परिणामी राज्याच्या प्रमुख आरोग्य सेवा संस्थेच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे. कोरोनाबाधितांमद्धे 100 हून अधिक डॉक्टरांचा समावेश आहे. रुग्णालयात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या केवळ 2-3 दिवसांत दुप्पट झाली आहे. (GMC Goa COVID-19 Latest Update)
प्रत्येक संक्रमित व्यक्तीला किमान सात दिवस होम आयसोलेशनमध्ये असणे आवश्यक आहे. सध्या GMC मधील अनेक आरोग्य कर्मचारी (Health Workers) कोरोनाबाधित आहेत. रूग्णालयाने आपल्या नित्य सेवा कमी केल्या असल्या तरीही, सामान्य माणूस आजारी पडल्यावर GMC कडेच धाव घेतो. ही बाब लक्षात घेत रुग्णालयाने (Hospital) आपत्ती व्यवस्थापन योजना आखणे आवश्यक आहे, असे रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले.
GMC मधील तीन विभाग प्रमुखांना कोविडची लागण झाली आहे आणि ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. सध्या, बहुसंख्य कोविड रूग्णांवर GMC च्या सुपर-स्पेशालिटी ब्लॉकमध्ये उपचार केले जातात.
ओमिक्रॉनची संसर्गक्षमता खूप जास्त असल्याने, पुढील काही दिवसांत आणखी GMC कर्मचार्यांची चाचणी सकारात्मक आली तर आश्चर्य वाटायला नको. राज्यात ख्रिसमसच्या आधी 31 हॉट स्पॉट होते. पुढे 4 जानेवारीपर्यंत हॉट स्पॉटची संख्या 73 झाली. येत्या काही दिवसांत ही संख्या 171 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, असे GMC मधील डॉक्टर म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.