गोव्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 10 मार्च रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच राजकीय पक्ष सत्तास्थापनेचा दावा करत आहेत. राज्यातील 2022 ची निवडणूक ही जनतेला अनेक घडामोडींनी व्यापलेली पाहायला मिळाली. दरम्यान राज्यातील गेल्या 10 वर्षाची भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी विरोधकांनी सगळे पर्याय अवलंबल्याचे पाहायला मिळाले यात भाजपने देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने भाजपाला पाठिंबा दिला तर त्यांचं आम्ही स्वागतच करू असं गोवा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी दैनिक गोमंन्तकशी बोलताना म्हटल आहे. 2012 मध्ये आमच्या 21 जागा येउनही त्यांचा पाठिंबा आम्ही स्वीकारला होता. यावेळी निकालानंतर जशी परिस्थिती निर्माण होईल त्यावरून आमचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. असंही तानावडे यांनी स्पष्ट केलय. गोमंन्तक टीव्ही चे संचालक संपादक राजू नायक यांनी घेतलेल्या मुलाखतीत तानावडे यांनी यावेळी गोव्यात (goa) भाजपाचेच (BJP) सरकार बहुमतात येईल असा दावाही केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, इतर पक्षातील नेते सांगत आहेत की भाजपचे अनेक नेते निवडून येणार नाहीत. त्यांना घटनेने बोलण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ते बोलत आहेत. मात्र, मी त्यांना सांगतो की मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी (Sanquelim) मतदार संघातून 5000 हजार मतांनी निवडून येणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.