..त्यामुळे भाजप स्वबळावर सरकार स्थापन करेल; सदानंद तानावडे

मनोहर पर्रीकर यांची कमी जाणवलीय, अस असल तरी..
Sadanand Shet Tanawade
Sadanand Shet TanawadeDainik Gomantak

गोव्यात नुकतीच विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 10 मार्च रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सगळेच राजकीय पक्ष सत्तास्थापनेचा दावा करत आहेत. राज्यातील 2022 ची निवडणूक ही जनतेला अनेक घडामोडींनी व्यापलेली पाहायला मिळाली. दरम्यान राज्यातील गेल्या 10 वर्षाची भाजपची सत्ता उलथवून लावण्यासाठी विरोधकांनी सगळे पर्याय अवलंबल्याचे पाहायला मिळाले, यात भाजपने देखील पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपली सगळी ताकद पणाला लावल्याचे पाहायला मिळाले.

Sadanand Shet Tanawade
मुरगाव नगरपरिषदेचे कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

दरम्यान, आज भाजपा नेते सदानंद तानावडे (Sadanand Tanawade) यांनी दैनिक गोमंन्तकशी दिलखुलास चर्चा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, भाजपने राज्यात 2012 पासून विकास कामे केली आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात भाजपला बहुमत मिळेल आणि 21 पेक्षा जास्त जागा भाजप जिंकून स्वबळावर सरकार (Government) स्थापन करेल. निवडणुका जरी संपल्या असल्या तरी भाजपचे राज्यात काम चालू आहे. पर्ये, वाळपई हे दोन मतदारसंघ सोडता भाजपने 38 मतदार संघात मतदानानंतर बैठका घेतल्या आहेत. यावेळी अस दिसून आल आहे की राज्यात पुन्हा भाजप सत्तेत येईल.

Sadanand Shet Tanawade
ढवळी उड्डाणपुलावर अपघात, प्रवासी किरकोळ जखमी

पुढे बोलताना ते म्हणाले की आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र या निवडणुकीत भाजपचे नेते स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांची कमी जाणवली आहे. अस असल तरी पक्षातील प्रत्येक नेत्यावर आणि कार्यकर्त्यावर याची कस भरून काढण्याची जबाबदारी होती. त्यामुळे सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली ताकद पणाला लावून या निवडणुकीचा (Election) सामना केला आहे. काही नेते सोडून गेले याचा पक्षाला काही फरक पडला नाही, कारण नेते जरी पक्ष बदलून गेले असले तरी कार्यकर्ते हे भाजपात (BJP) होते. त्यामुळे त्यांच्या जाण्याचा पक्षाला काही फरक पडला नाही, अस मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com