Mahadayi River Dainik Gomantak
गोवा

Mahadayi River: म्हादईचे पाणी वळविल्यास सत्तरीचे अस्तित्व धोक्यात

जलसाठ्यावर मर्यादा येईल, त्यामुळे सत्तरी तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

दैनिक गोमन्तक

Sattari: कर्नाटकने म्हादईचे पाणी वळविल्यास सत्तरीचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता असून दाबोस पाणी प्रकल्पावर परिणाम होणार आहे. जलसाठ्यावर मर्यादा येईल, त्यामुळे सत्तरी तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होणार आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

या कळसा धरणामुळे म्हादईचे पात्र पावसाळा वगळता अन्य हंगामात पूर्णत: कोरडे राहणार आहे. सत्तरीत सर्व भागातील लोक या ‘दाबोस’ प्रकल्पाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. पाच हजार व दहा हजार एमएलडीचे असे दोन प्रकल्प आहेत.

या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले पाणी दाबोसच्या उंच डोंगराच्या टेकडीवरील साडेतीन हजार घनमीटर क्षमतेच्या टाकीत पाणी सोडले जाते. टँकरव्दारे, जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा लोकांना केला जातो.

शेती, बागायती ओसाड पडणार

पाणी प्रकल्पाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा निर्माण झाली असली तरीसुद्धा म्हादई नदीवर अनेक ठिकाणी बंधारे उभारण्यात आलेली आहे. या बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करण्यात आलेला आहे. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत भूगर्भातील पाण्याची पातळी वाढलेली आहे.

सात ग्रामपंचायती व वाळपई नगर पालिका संपूर्ण क्षेत्र एवढ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील असंख्य गावांना म्हादईचे पाणी चोवीस तास शुध्दीकरण करुन पुरविले जाते.

दाबोस गावात 15 एम.एल.डी असा प्रकल्प सुरु असून लोकांना दाबोस प्रकल्पाचे पाणी दररोज जलवाहिनी, टॅंकरव्दारे पुरविले जाते. कळसा-भांडुरा प्रकल्पामुळे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे, असे सहाय्यक अभियंता प्रशांत गावडे यांनी सांगितले.

ग्रामीण जीवनावर परिणाम

सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागातील जीवन कर्नाटक सरकारच्या खेळीमुळे उद्‍ध्वस्त होण्याची भीती आहे. गोवा सरकारने वारंवारपणे या संदर्भात हालचाली सुरू केल्या असताना सुद्धा कर्नाटक सरकार मात्र आपले ध्येय साध्य करण्यात यशस्वी ठरलेली आहे. सत्तरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT