Mauvin Godinho
Mauvin Godinho Gomantak Digital Team
गोवा

IDC Project : आयडीसी’मधील प्रकल्प बंद : उद्योगमंत्री माविन यांंची कबुली

गोमन्तक डिजिटल टीम

केवळ डिचोलीतच नव्हे, तर राज्यातील वेगवेगळ्या औद्योगिक वसाहतींमधील काही उद्योग प्रकल्प बंद पडले आहेत, अशी कबुली उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. आजारी उद्योगांना संजीवनी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.

लाटंबार्से येथे सोमवारी एका कार्यक्रमासाठी मंत्री गुदिन्हो आले असता, डिचोली आयडीसीमधील आजारी उद्योगांसंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. गोव्यातील बाजारपेठ लहान असून, लॉजिस्टिकल समस्या आहे. त्यामुळे काही उद्योग प्रकल्पांना त्याचा फटका बसला असून काही उद्योग प्रकल्प तर गेल्या दहा वर्षांपासून बंद असल्याचे त्यांनी सांगितले.

आढावा घेऊ!

डिचोलीसह वेर्णा आणि अन्य औद्योगिक वसाहतींमधील काही उद्योगधंदे बंद पडले आहेत. डिजिटल सर्व्हेद्वारे बंद पडलेल्या उद्योग प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार असून, ते पुनरुज्जीवित करण्यासाठी काय करता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येईल. गरज पडली तर बंद उद्योग अन्य उद्योजकांना देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:...तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; आपचे डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान

'विवाहित मुस्लिम पुरुषाला लिव्ह इनमध्ये राहण्याचा अधिकार नाही': अलाहाबाद हायकोर्ट

Goa Seashore : किनाऱ्यावरील ‘ती’ जागा पूर्ववत करण्यासाठी पाहणी

Fireworks Factory Big Explosion: शिवकाशीतील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

महिलांना ‘स्वीटी’ आणि ‘बेबी’ म्हणणे लैंगिक टिप्पणी आहे का? वाचा हायकोर्टाने काय दिला निर्णय

SCROLL FOR NEXT