Chhatrapati Shivaji Maharaj : पोर्तुगिजांची छाप पुसून ‘नवा गोवा’ घडविणार : मुख्यमंत्री

बेतूल किल्ल्याचा वारसा जपणार
350th Coronation Day of Chhatrapati Shivaji Maharaj
350th Coronation Day of Chhatrapati Shivaji MaharajDainik Gomantak

गोवा मुक्तीनंतरही राज्यावर पोर्तुगिजांच्या खाणाखुणा अजूनही जिवंत आहेत. 2047 पर्यंत पोर्तुगिजांची छाप पुसून ‘नवा गोवा’ घडविण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बेतूल येथे केले.

बेतूल किल्ल्याचा वारसा जपण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून जकात खात्याकडून जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाचे काम हाती घेणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. बेतूल किल्ल्यावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार एल्टन डिकॉस्ता, बाबू कवळेकर उपस्थित होते.

350th Coronation Day of Chhatrapati Shivaji Maharaj
Goa Engineer Mega Recruitment: उमेदवारांना कळविण्याचीही तसदी नाही

मंत्री गावडे म्हणाले, की राज्याभिषेक सोहळा केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून तो प्रत्येक दिवशी साजरा करणे आवश्यक आहे. सुभाष फळदेसाई म्हणाले, उद्‌ध्वस्त झालेल्या सप्तकोटेश्वर मंदिराचेही आम्ही पुनर्निर्माण केले आहे.

वर्षभर कार्यक्रम

350 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली व त्याप्रमाणे कार्यही केले. हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्यास शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा सिहांचा वाटा आहे. म्हणूनच पुढील एक वर्ष पुरातत्व खाते आणि शिक्षण खाते संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित कार्यक्रम राबवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

"बेतूल किल्ला हे गोव्याचे ऐतिहासिक वैभव आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. किल्ल्याचा वारसा जपण्यासाठी सरकारी पातळीवरही प्रयत्न सुरू आहेत. बेतूल किल्ल्याच्या जागेचा ताबा सध्या जकात खात्याकडे आहे. तो ताबा पुरातत्व खात्याकडे येणार आहे. त्यानंतर लगेच किल्ल्याच्या साैंदर्यीकरणाचे काम हाती घेण्यात येईल."

डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com