Goa Accidents Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: इचलकरंजीच्या तरुणाचा गोव्यात अपघाती मृत्यू; कामावरुन घरी जाताना काळाचा घाला

Goa Fatal Accident: जखमी झालेल्या अवधूतला दक्षिण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला होता.

Pramod Yadav

मडगाव: सांकवाळ येथे झालेल्या अपघातात इचलकरंजी, कोल्हापूर येथील २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. कामावरुन घरी जात असताना तरुणावर काळाने घाला घातला. तरुण कारमधून घरी जात असताना समोरुन आलेल्या वाहनाच्या प्रकाश झोतामुळे चालकाला अंदाज न आल्याने तो झाडावर आदळला. यातच त्याचा मृत्यू झाला.

अवधूत संजय जाधव (वय २९, रा. इचलकरंजी, कोल्हापूर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अवधूत कामानिमित्त गोव्यात वास्तव्यास होता. अवधूत जाधव कारमधून कामावरुन घरी जात होता. यावेळी समोरुन आलेल्या वाहनाच्या प्रकाशझोतात त्याला अंदाज न अल्याने त्याची कार झाडावर कोसळली.

जखमी झालेल्या अवधूतला दक्षिण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, त्यापूर्वीचा त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या पश्चात अडीच वर्षांचा लहान मुलगा, पत्नी, वडील व भाऊ असा परिवार आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT