Goa Fishing Ban: गोव्यात एक जूनपासून दोन महिने मासेमारीला बंदी; सरकारची घोषणा

Fishing Ban In Goa: गोवा सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1980 (1981 चा कायदा क्रमांक 3) च्या कलम 4 च्या उपकलम (1) आणि (2) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
Annual Fishing Ban In Goa
Fishing Ban In GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्यात वार्षिक मासेमारी बंदी सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. येत्या ०१ जूनपासून ३१ जुलैपर्यंत ही बंदी राहणार आहे. मान्सूनचे सुरवातीचे दोन महिने राज्यात दरवर्षी ही बंदी घातली जाते.

०१ जूनपासून ३१ जुलै या ६१ दिवसांच्या बंदी कालावधीत यांत्रिक साधने बसवलेल्या जहाजांद्वारे मासेमारी , ट्रॉल-नेट आणि पर्स-सीन नेटद्वारे मासेमारी करण्यास मनाई असणार आहे. गोवा सागरी मासेमारी नियमन अधिनियम, 1980 (1981 चा कायदा क्रमांक 3) च्या कलम 4 च्या उपकलम (1) आणि (2) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Annual Fishing Ban In Goa
Kolamba Lake: कमळांसाठी प्रसिद्ध असलेले गोव्यातील 'कोळम' तळे उद्धाराच्या प्रतीक्षेत! पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज

राज्यात मासेमारीला बंदी असलेल्या काळात होड्यांवर काम करणारे परराज्यातील कर्मचारी आपापल्या घरी परतात. ३१ मेनंतर ट्रॉलर्समालकांना मच्छीमारी जेटीचा वापर व्यवसायासाठी करता येत नाही. ३१ मे पर्यंत मच्छीमार होड्यासह विविध साहित्यांची आवराआवर सुरू करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pramod Sawant Mapusa Fish Market Visit
Goa dog breed ban court case
Goa House Regularization
Goa POP Ganesh Idols Ban
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com