Arrest Dainik Gomantak
गोवा

Cricket Betting Racket: भारत बांगलादेश सामन्यावर सट्टा; गोव्यात गुजरातच्या तिघांना अटक

Cricket Betting Raid Pilerne Goa: विविध राज्यांतून काही सट्टेबाज गोव्यात दाखल झाले असून ते भाडेपट्टीवर फ्लॅट व काही बंगले घेऊन आहेत. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून पोलिसांनी सट्टेबाजांवर नजर ठेवली आहे.

Sameer Panditrao

ICC Championship Betting Raid Goa Pilerne

पणजी: सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीच्या सट्टेबाजीसाठी गोवा हे सुरक्षित स्थळ म्हणून निवडण्यात येते. त्यामुळे विविध राज्यांतून काही सट्टेबाज गोव्यात दाखल झाले असून ते भाडेपट्टीवर फ्लॅट व काही बंगले घेऊन आहेत. ही स्पर्धा सुरू झाल्यापासून पोलिसांनी सट्टेबाजांवर नजर ठेवली आहे. काल रात्री पिळर्ण येथील एका बंगल्यावर धडक कारवाई करत तिघांना अटक केली आहे.

या कारवाईवेळी मोबाईल व लॅपटॉपसह सुमारे १.१० लाखांचे साहित्य जप्त केले आहे, अशी माहिती पर्वरी पोलिस निरीक्षक राहुल परब यांनी दिली. पोलिसांनी मकसुद मोदान (२८, बोताड-गुजरात), आसिफभाई जियाउद्दीनभाई (२५, बोताड-गुजरात) आणि रिझवान बाश (२०, राजकोट-गुजरात) यांना अटक केली आहे. पिळर्ण येथील एका बंगल्यात चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत वि. बांगलादेश सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार ही कारवाई करत सट्टेबाजी ऑनलाईन पद्धतीने करताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या कारवाईत ४ मोबाईल, १ लॉपटॉप, इंटरनेट राऊटर्स इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी उत्तर गोवा अधीक्षक अक्षत कौशल, पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली व पर्वरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी पोलिस पुढील तपास करत आहेत.

सट्टेबाजीचे प्रकार गोव्यात!

देशात किंवा परदेशात क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यावर सट्टेबाजीचे प्रकार सर्रास गोव्यात सुरू होतात. त्यासाठी राज्याबाहेरील सट्टेबाज अगोदरच येऊन भाडेपट्टीवर फ्लॅट किंवा बंगले घेऊन राहतात. अनेकदा फ्लॅट किंवा बंगल्यामध्ये काय चालले आहे याचा थांगपत्ताही लागत नाही. अशावेळी पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत अशा सट्टेबाजांची माहिती मिळवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी म्हापसा येथे पोलिसांनी कारवाई केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT