MLA Krishna Salkar dainik gomantak
गोवा

'रखडलेल्या विकासासाठी मतदारांनी मला आमदार बनवले'

'पाच वर्षात मी वास्कोच्या विकासासाठी काम करणार'

दैनिक गोमन्तक

वास्को : वास्को मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांची रॅली आज संध्याकाळी शेकडो मतदार कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रॅली पार पडली. भाजप तिकिटावर निवडून आलेले कृष्णा साळकर यांच्या रॅलीला वरुणापुरी इथून सुरुवात झाली. नंतर मांगूरहील, बायणा, ब्रह्मस्थळ, रवींद्र भवन मार्गे वास्को शहर परिसर, ड्रायव्हर हील, नंतर नवेवाडे येथे रॅलीची सांगता झाली. यावेळी आमदार कृष्णा साळकर यांच्या समवेत दीपक नाईक, जयंत जाधव, रुपेश पालयेकर, कृष्णा सातार्डेकर, गौरीश नाईक व इतर शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (I will work for the development of Vasco says MLA Krishna Salkar)

कृष्णा साळसकर यांनी हात उंचावून आपल्या मतदार प्रजेला अभिवादन केले. फटाक्यांच्या आतषबाजीत, डीजे बॅण्डवादनासहीत नाच गाण्यांच तालावर शेकडो वाहनासहीत साळकर यांची रॅली पुढे सरसावत होती. तसे त्यांचे चाहते त्यांच्या स्वागतार्थ रस्त्यावर उभे राहून साळकर यांचे अभिनंदन करत होते.

यावेळी बोलताना साळकर म्हणाले की, रखडलेला वास्कोचा विकास चालीस लागावा यासाठी मतदारांनी मला आमदार बनवले आहे. माझी नगरपालिकेची (Municipality) निवडणूक असूद्या की विधानसभा निवडणूक प्रत्येकवेळी वास्कोतील मतदारांनी साथ दिली आहे. भाजप उमेदवारी देखील माझ्या विजयाचे मोठे कारण आहे. पुढच्या पाच वर्षात मी वास्कोच्या विकासासाठी काम करणार असल्याचे वास्को मतदारसंघाचे नवनिर्वाचीत आमदार कृष्णा ऊर्फ दाजी साळकर (MLA Krishna Salkar) यांनी सांगितले.

वास्कोत (Vasco) पावसाळ्यात तसेच इतरवेळी वीजपुरवठा खंडीत होण्याची समस्या उपस्थित होते ती दूर करण्यासाठी भूमीगत वीजवाहीन्या घालण्यात येतील. भविष्यात मुरगावनगरपालिकेच्या (Murgaon Municipality) कामगारांचा पगार वेळेत व्हावा, पालिकेला असलेली आर्थिक समस्या दूर व्हावी आणि इतर समस्या सरकार आणि नगरविकासमंत्र्यांच्या मदतीने दूर केल्या जाणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.

पुढच्या पाच वर्षात वास्को मतदारसंघाला एक आदर्श मतदारसंघ (Constituency) बनवण्यासाठी येथे अनेक विकासकामे हातात घेऊन ती पूर्ण केली जाणार असून यासाठी मला सरकार, मुख्यमंत्री (CM) आणि इतर मंत्र्यांची नक्कीच पाठींबा मिळणार. गेली दहा वर्षे वास्कोचा विकास रखडल्याने जनता मोठ्या प्रमाणात नाराज झाली होती, आणि भविष्यात हा विकास मी करावा यासाठी मतदारांनी मला पाठींबा दिला.

वास्कोत दहा वर्षापासून अनेक विकासकामे रखडलेली आहेत. ती पूर्ण व्हावी यासाठी मला मतदारांनी भरघोस मतांनी निवडून आणले आहे. वास्कोच्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे सर्वात आधी रस्ते (Road) दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. वास्कोतील रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. त्याचबरोबर वास्को कदंब (Vasco Kadamba) बसस्थानक (Bus Stand) प्रकल्पही मार्गी लावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

SCROLL FOR NEXT