जल, वायू प्रदूषणाबाबतच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याची GSPCB ची मागणी

'नियम हे GSPCB सोबत सल्लामसलत केल्यानंतरच बनवले जावेत'
GSPCB
GSPCB dainik gomantak

पणजी: गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (GSPCB) गोवा जल आणि गोवा वायु नियम 2021 च्या अधिसूचित सुधारणांची मागणी केली आहे. तेसच या नियमांमुळे मंडळाच्या सुरळीत कामकाजात अडथळा निर्माण होईल, असे निरीक्षण नोंदवला आहे. (GSPCB demands amendment of water and air pollution regulations)

यावेळी GSPCB सदस्य सचिव शमिला मोंटेरो यांनी सांगितले की, जल (Water) कायद्यातील कलम 64 आणि हवाई कायद्यातील कलम 54 हे कायद्यांची उद्दिष्टे पार पाडण्यासाठी नियम (Rules) बनवण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र हे नियम GSPCB सोबत सल्लामसलत केल्यानंतरच बनवले जातील, बदलले जातील, सुधारले जातील किंवा ते रद्द केले जातील.

राज्य सरकारकडून, काही शिफारसी केल्या गेल्या आहेत. त्यात मात्र जीएसपीसीबीने सादर केलेले मुद्दे विचारात घेतले नाहीत. तसेच काही नियमांची भर पडली असून काही दुरुस्त करण्यात आली आहेत. काही नियम बदलले गेले असून काही रद्द केले गेले आहेत.

ज्यामुळे GSPCB च्या सुरळीत प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होईल असे वाटत आहे. त्यामुळे नियम हटविणे, नविन नियम बनविणे, काही दुरूस्त करणे आणि बदल करणे यांचा अभ्यासही GSPCB ने केला आहे.

GSPCB
आरजीचे उद्दीष्ट 2027, गोव्यातील सर्व निवडणुका लढविणार

यावेळी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सर्वानुमते नियमांसर्भात केलेल्या अभ्यासाचा अहवाल (Report) राज्य सरकारकडे पाठवला आहे. तसेच काही नियमांच्या बाबतीत आक्षेप घेऊनही मसुद्याच्या नियमावलीत त्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला नसल्याची गंभीर दखल ही मंडळातील सदस्यांनी घेतली आहे.

तसेच नियमांमध्ये कोणत्याही सुधारणा करताना त्या मंडळाच्या निदर्शनास आणून द्याव्यात आणि मंडळाशी सल्लामसलत करून सूचित करण्यात असे पर्यावरण आणि हवामान बदल विभागाला (Department of Environment and Climate Change) कळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com