Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

मुंडकार खटल्यांसाठी यापुढे 'तारीख पे तारीख' नाही'

दैनिक गोमन्तक

पणजी : माझ्याकडे असलेली तिन्ही खाती लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहेत. तिन्ही खात्यांना योग्य न्याय देणार असल्याचं बाबूश मोन्सेरात यांनी स्पष्ट केलं आहे. मुंडकार खटल्यांसाठी यापुढे 'तारीख पे तारीख' नाही, तर 6 महिन्यांत प्रलंबित खटले सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचंही गोव्याचे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी म्हटलं आहे.

तब्बल एक आठवड्यानंतर महसूल, कामगार आणि कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज आपल्या पदाचा ताबा घेऊन कार्यालयात हजेरी लावली. आज ते महसूल विभागातील वरिष्ठांशी चर्चा करणार असून कामाचा आढावा आणि पुढील कामकाजाची आखणी करणार आहेत. मनासारखी खाती न मिळाल्यामुळेच बाबूश मोन्सेरात (Babush Monserratte) यांनी आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा ताबा घेतला नसल्याची चर्चा होती.

मागील सरकार स्थिर राहावे यासाठी पुढाकार घेऊन काँग्रेसचा (Congress) दहाजणांचा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे मंत्री बाबूश मोन्सेरात हे त्यांना मनासारखी खाती मिळालेली नसल्याने नाखुश असल्याची चर्चा होती. मागील सरकारमध्ये त्यांनी स्वतःला मंत्रिपदापासून दूर ठेवत पत्नी जेनिफर मोन्सेरात (Jennifer Monserratte) यांना मंत्रिपद देण्याची शिफारस केली होती. मात्र, यावेळी जेनिफर यांना वगळून बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT