Dr. Geeta Kakodkar appointed as health director of Goa
Dr. Geeta Kakodkar appointed as health director of Goa

डॉ. गीता काकोडकर गोव्याच्या नव्या आरोग्य संचालक

गोमेकॉ डीन वाद ताजा असतानाच आरोग्य खात्यात मोठे बदल
Published on

पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन पदाचा वाद ताजा असताना आता गोवा आरोग्य खात्यात नवे बदल करण्यात आले आहेत. डॉ. गीता काकोडकर यांची आरोग्य खात्याच्या नव्या संचालक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. पूर्वीच्या संचालक आयरा अलमेदा यांची राष्ट्रीय आरोग्य मिशनवर संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Dr. Geeta Kakodkar appointed as health director of Goa)

Dr. Geeta Kakodkar appointed as health director of Goa
गोमेकॉच्या डीन नियुक्तीचा निर्णय काही तासांतच फिरवला

दरम्यान गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीक्षकपदाचा निर्णय आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काही तासांतच फिरवून आपल्या बाजूने केला. मंत्रिमंडळात दोन नंबरचे स्थान पटकावलेल्या राणेंनी हे प्रशासनाला दिलेले आव्हानच मानले जात आहे.

मागच्याच सोमवारी सकाळी प्रशासनाचे अव्वर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधीक्षकपदी डॉ. जयप्रकाश तिवारी यांच्या नियुक्तीचे परिपत्रक काढले होते. पण संध्याकाळ होताच आरोग्यमंत्र्यांनी हा निर्णय स्थगित ठेवण्यात आला असून गोमेकॉच्या (GMC) अधीक्षकपदी डॉ. शिवानंद बांदेकर हेच राहतील, असे ट्विट केले. याचे अनेकांना आश्चर्य वाटले असले तरी राणेंचा मंत्रिमंडळातील दबदबा वाढल्याचे यातून दिसून आले.

Dr. Geeta Kakodkar appointed as health director of Goa
तब्बल आठवड्यानंतर बाबूश यांनी घेतला मंत्रिपदाचा ताबा

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात नेफ्रॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. तिवारी हे ज्येष्ठतेच्या आधारे डीनपदासाठी पात्र आहेत. गोवा लोकसेवा आयोगानेही यापूर्वीसुद्धा त्यांची या पदासाठी नियुक्ती केली होती. मात्र, विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांच्या मर्जीतील अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शिवानंद बांदेकर यांना हे पद देण्यात आले. नव्या मंत्रिमंडळातही आरोग्यमंत्रीपदही पुन्हा राणे यांच्याकडे आले. आज सकाळी प्रशासनाने तिवारी यांच्या नियुक्तीचा आदेश ‘जारी’ केला. त्यामुळे राणे यांनी मुख्यमंत्र्यांशी (CM) चर्चा करून या निर्णयाला स्थगिती दिल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com