तब्बल आठवड्यानंतर बाबूश यांनी घेतला मंत्रिपदाचा ताबा

महसूल विभागातील वरिष्ठांशी चर्चा करुन पुढील नियोजन करणार असल्याची माहिती
Babush Monserratte
Babush MonserratteDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : तब्बल एक आठवड्यानंतर महसूल, कामगार आणि कचरा व्यवस्थापन मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज आपल्या पदाचा ताबा घेऊन कार्यालयात हजेरी लावली. आज ते महसूल विभागातील वरिष्ठांशी चर्चा करणार असून कामाचा आढावा आणि पुढील कामकाजाची आखणी करणार आहेत. मनासारखी खाती न मिळाल्यामुळेच त्यांना आतापर्यंत आपल्या मंत्रिपदाचा ताबा घेतला नसल्याची चर्चा होती.

Babush Monserratte
मुंडकाराच्या खटल्यांना सहा महिन्यांत निकाली काढणार : बाबूश

गोव्यात (Goa) सध्या मुंडकारांच्या खटल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच प्रलंबित खटल्यांना येत्या 6 महिन्यामध्ये निकाली काढणार असल्याचं आश्वासन महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिलं आहे. मुंडकारांचे तब्बल 16,260 खटले 2012 पासून निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आता बाबूश यांनी पुढाकार घेतल्याने मुंडकारांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुंडकारांचे दाखल असलेले प्रलंबित खटले लवकरात लवकर निकाली काढून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बाबूश (Babush Monserrate) यांनी स्पष्ट केलं आहे.

Babush Monserratte
गोवा खातेवाटपानंतर बाबूश मोन्सेरात 'नाराज'

दरम्यान मागील सरकार स्थिर राहावे यासाठी पुढाकार घेऊन काँग्रेसचा (Congress) दहाजणांचा गट घेऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे मंत्री बाबूश मोन्सेरात हे त्यांना मनासारखी खाती मिळालेली नसल्याने नाखुश असल्याची चर्चा होती. मागील सरकारमध्ये त्यांनी स्वतःला मंत्रिपदापासून दूर ठेवत पत्नी जेनिफर मोन्सेरात यांना मंत्रिपद देण्याची शिफारस केली होती. मात्र, यावेळी जेनिफर यांना वगळून बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांची नजर नगरनियोजन खात्यावर असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळेच आतापर्यंत त्यांनी मंत्रिपदाचा ताबा घेतला नसल्याचीही चर्चा होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com