Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

गोव्याचे माजी मुख्यमंत्री म्हणतात 'मी पोर्तुगीजांना सलाम करतो', मुक्तिदिनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद

मी पोर्तुगीजांना सलाम करतो असे गोवा मुक्तिदिनी आलेमाव यांनी वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Pramod Yadav

Churchill Alemao: गोव्याला 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. गोव्याचा मुक्तिदीन साजरा होत असताना राज्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनी केलेल्या वक्तव्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

मी पोर्तुगीजांना सलाम करतो असे गोवा मुक्तिदिनी आलेमाव यांनी वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

चर्चिल आलेमाव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

चर्चिल आलेमाव काय म्हणाले?

पोर्तुगीजांनी जाताना 1962 पूर्वी जन्मलेल्या गोमन्तकीयांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळवण्याची दारे खुली केली. यामुळे सासष्टी तालुक्यातील गरिबी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असा अजब दावा आलेमाव यांनी केला. नागरिकत्व मिळत असल्याने गोव्यातील नागरिकांना युरोपियन देशात नोकरी मिळू शकते असेही आलेमाव म्हणाले.

राज्यात बेरोजगारी वाढत आहे, सरकार सर्वांना नोकरी देऊ शकत नाही. नागरिकत्वामुळे विदेशात नोकरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे नागरिकत्वाच्या तरदुतीसाठी मी मी पोर्तुगीजांना सलाम करतो असे वक्तव्य आलेमाव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT