Calangute Sarpanch Joseph Sequeira Dainik Gomantak
गोवा

Calangute Sarpanch: 'मी पण शिवप्रेमीच, पण...' कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा काय म्हणाले वाचा...

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून झालेल्या वादानंतर स्पष्ट केली भूमिका

Akshay Nirmale

Calangute Sarpanch Joseph Sequeira: कळंगुटमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादानंतर येथील सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर सिक्वेरा यांनी आपले म्हणणे मांडले.

यावेळी बोलताना सिक्वेरा म्हणाले की, मी पण शिवप्रेमीच आहे. मी 30 वर्षांपासून पंचायतीच्या राजकारणात आहे. पण धर्माच्या आधारे कधीही कुठल्याही धर्माबाबत भेदभाव केलेला नाही. मी शाळेत मराठी विषय शिकलो आहे. उलट फ्रेंच भाषा टाळून मी मराठी विषय घेतला होता. काही प्रसारमाध्यमांनी आणि काही लोकांनी जाणीवपूर्वक शिवप्रेमींना भडकावण्याचा प्रयत्न केला.

जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे तो भाग अपघात प्रवण क्षेत्र आहे. त्यामुळे या रस्त्यातील त्या आयलंडमधून पुतळा हटविण्याबाबतचा निर्णय पंचायतीने एकमताने घेतला होता. पुतळा उद्धस्त करा किंवा नष्ट करा, असे आम्ही कधीही म्हटलेले नाही, असे स्पष्टीकरणही सिक्वेरा यांनी दिले.

सिक्वेरा म्हणाले की, परवाचा जो प्रकार होता तो काही जणांनी केलेला पब्लिसिटी स्टंट होता. जाणीवपुर्वक या वादाला हिंदू विरूद्ध कॅथलिक बनविण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. कळंगुटमध्ये शांतादुर्गा मंदीर आहे, बीचजवळ साईबाबा मंदीर आहे.

तिथे आम्ही कधी विरोधाचा प्रयत्न केला का? उलट आम्ही परवाने दिले. त्यामुळे कुणीही दोन धर्मांत असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.

ते म्हणाले, आम्ही पुतळा दहा दिवसात हटवा, असे म्हटले होते. खरे तर मुदत सात दिवसांचीच दिली जाते. पण संबंधित गटाने येऊन चर्चा करायची होती. आम्ही सुप्रीम कोर्टाच्या हवाल्याने निर्देश दिले होते. पण लोकांना मुद्दाम भडकावण्यात आला.

मला व्हिलन ठरविण्याचा प्रयत्न केला गेला. 30 वर्षे राजकारणात आहे, पण कधी कुणाचे वाईट केले नाही. मी कायद्याने वागणारा माणूस आहे. उच्च ऑथरिटी या निर्णयाला स्थगिती देऊ शकते, असेही सिक्वेरा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Unlucky Zodiac Signs: अंगारक योगामुळे वाढणार अडचणी; 'या' तीन राशींनी कर्ज, गुंतवणूक आणि मोठे व्यवहार टाळावेत

Majhe Ghar Scheme: 'माझे घर' योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी! तक्रारी निवारणासाठी विशेष हेल्पलाईन सुरू

Baga Beach Safety: 'डेथ पॉईंट' ठरणार का हा कठडा? बागात विशेष टास्क फोर्स आणि कडक नियमांची स्थानिकांची मागणी

Goa Drunk Driving: मद्यपी चालकांवर आता थेट गुन्हे! वाहतूक खात्याचा निर्णय, पोलिसांना कठोर कारवाईच्या सूचना

Bastora Fire Incident: मुले शाळेत, आई-वडील कामावर अन् मागे सगळंच संपलं! सोन्याचे दागिने, कपडे अन् अन्नधान्य जळून खाक; दुर्घटनेत कुटुंबाचे नुकसान

SCROLL FOR NEXT