Hyderabad Police Dainik Gomantak
गोवा

Goa Drugs : ड्रग्ज दलालांच्या शोधार्थ हैदराबाद पोलिस गोव्यात

अटकेत असलेला ‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस याचीही ते चौकशी करण्याची शक्यता आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Drugs : काही दलाल गोव्यातून तेलगंणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशय हैदराबाद पोलिसांना आहे. याप्रकरणी तेथील पोलिसांनी हणजुणे येथील एकाला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासासाठी हैदराबाद पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली पथक राज्यात दोन दिवसांच्या भेटीवर आले आहे. अटकेत असलेला ‘कर्लिस’चा चालक एडविन नुनीस याचीही ते चौकशी करण्याची शक्यता आहे.

गोव्यात आज आलेल्या हैदराबाद पोलिस पथकाने राज्याचे पोलिस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांची भेट घेऊन घेतली. तेलगंणा व गोवा या राज्यांमधील ड्रग्ज दलाल-विक्रेते यांचे रॅकेट यासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर संध्याकाळी अंमलीपदार्थविरोधी कक्षाचे निरीक्षकांशी चर्चा करून ड्रग्जसंदर्भात माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी अमलीविरोधी कक्षाने म्हापसा बसस्थानकाजवळ हैदराबादच्या तरुणाला दोन किलो गांजासह अटक केली होती.

त्याने हा गांजा हैदराबाद येथून गोव्यात आणला होता. हैद्राबाद पोलिस पथकाच्या अधीक्षकांनी या संशयिताशी चौकशी केली व त्याने हैद्राबादमधून गांजा कोठून आणला त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गोव्यातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज हैदराबादमध्ये येत असल्याचा तेथील पोलिसांनी कांगावा केला होता. त्यांनी हैदराबादमध्ये नोंद केलेल्या ड्रग्ज प्रकरणांत गोव्यातील सुमारे दिडशेहून अधिक नावे त्यामध्ये नोंदविली आहेत. त्यातील एक प्रितेश बोरकर याला घेऊन इतरांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना त्यात यश आलेले नाही. दरम्यान, एडविन नुनीस याचे नाव हैद्राबाद पोलिसांनी नोंद केलेल्या गुन्ह्यात असल्याच्या भीतीने त्याने अटकपूर्व जामिनासाठी हैद्राबाद न्यायालयात अर्ज केला आहे.

आरोप-प्रत्यारोपाचे वारे शमले

कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला होता व त्याचा चालक एडविन नुनीस ड्रग्ज प्रकरणामध्ये असल्याचे नमूद करून गोवा पोलिस त्याला पाठिशी घालत असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे गोवा-हैदराबाद पोलिसांमध्ये या ड्रग्ज प्रकरणावरून ठिणगी उडाली होती. या प्रकरणाला पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले होते. हैदराबाद पोलिसांनी केलेल्या आरोपांचे खंडन करून गोवा पोलिसांनी उत्तर दिल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून हे आरोप - प्रत्यारोपाचे वारे शमले आहे. हैदराबाद पोलिस त्यावर पांघरूण घालण्यासाठी तसेच गोव्यात अटक केलेल्या हैद्राबादच्या ड्रग्ज विक्रेत्याकडून माहिती मिळवण्यासाठी गोव्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: झाड पडलेल्या घराची वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली पाहणी

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT