Goa Sports : क्रिकेटच्या पीचवरच तरुण खेळाडूचा मृत्यू

मित्रांचे प्रयत्न अयशस्वी; मळेवाडा-कामुर्लीतील हृदयद्रावक घटना
Cricket on turf
Cricket on turf Dainik Gomantak

Goa Sports : क्रिकेटप्रेमी व या खेळाचा चाहता असलेल्या मळेवाडा-कामुर्लीच्या तरुणाने क्रिकेटच्या मैदानावर अखेरचा श्‍वास घेतला. पांडुरंग विठू खोर्जुवेकर या एकोणचाळीस वर्षीय तरुणाचा दुर्देैवी अंत झाला. वाघबीळ मैदानावर ही प्रत्येकाच्या मनाला चटका लावणारी घटना घडली.

रविवारचा दिवस असल्याने वाड्यावरील मित्रांसोबत पांडुरंग नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळायला गेला. यावेळी सुरवातीला पांडुरंगच्या संघाने पहिली फलंदाजी केली. तेव्हा पांडुरंग आपल्या संघाकडून शेवटच्या षटकापर्यंत धावपट्टीवर होता.

याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने आपल्या जीवनातील त्या अखेरच्या दोन धावा काढल्या. त्यानंतर बॅट बाजूला ठेवून क्षेत्ररक्षणासाठी तो फक्त जेमतेम दोन ते तीन पावले चालला खरा, पण त्यास अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो धावपट्टीवर बसला आणि क्षणार्धात जमिनीवर कोसळला.

मित्रांनी त्याच्या तोंडावर पाणी मारले. त्याच्या भावाला बोलावून घेतले व त्याच्याच चारचाकीत घालून त्यास दवाखान्यात नेले. रस्त्यात मिळालेल्या रुग्णवाहिकेत घालून म्हापसा जिल्हा इस्पितळात गाठले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

Cricket on turf
Goa Congress Rebel : दीर्घ प्रतिक्षेनंतर काँग्रेसमधील बंडखोरांची अमित शहा, नड्डांसोबत चर्चा

हृदयविकाराचा झटका

ही घटना रविवारी (18 सप्टेंबर) सकाळी घडली. पांडुरंगच्या मृतदेहावर गोमेकॉत शवचिकित्सा झाली असता, त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे आज स्पष्ट झाले. पांडुरंग हा रक्तदाब व मधुमेहाचा रुग्ण होता. तो पिळर्ण येथील एका खासगी आस्थापनात कामाला होता. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले आहेत. कोलवाळ पोलीस उपनिरीक्षक कुणाल नाईक यांनी पंचनामा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com