काही दलाल गोव्यातून तेलगंणात ड्रग्जची तस्करी करत असल्याचा संशयावरुन हैदराबाद पोलिसांचे पथक गोव्यात चौकशीसाठी आले होते. कर्लिस बीच शॅक रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची उलाढाल होत असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला होता.
त्याचा चालक एडविन नुनीस ड्रग्ज प्रकरणामध्ये असल्याचे नमूद करून गोवा पोलिस त्याला पाठिशी घालत असल्याचे आरोप केले होते. त्यामुळे गोवा-हैदराबाद पोलिसांमध्ये या ड्रग्ज प्रकरणावरून ठिणगी उडाली होती. या प्रकरणाला पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी सडेतोड उत्तर दिले होते.
दरम्यान गोव्यातील एका 27 वर्षीय तरुणाला गुरुवारी हैदराबादमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवैध ड्रग्जची विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे. यावेळी संशयिताकडून रचकोंडा पोलिसांनी ७.९ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सायन लाहिरी (27) म्हापसा, गोवा असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. लाहिरीकडे 3 लाख रुपये किमतीची ब्लू पनीशर-60 (निळ्या रंगाची एमडीएमए गोळी), 2 लाख रुपये किमतीची लकासा डेल पेपर-40 (गुलाबी रंगाची एमडीएमए गोळी) आणि 1.8 लाख रुपये किमतीचे मॅंडी ड्रग (क्रिस्टल फॉर्ममध्ये एमडीएमए ड्रग्स) होते. याशिवाय सुमारे 1 लाख रुपये किमतीचे 3.9 ग्रॅम कोकेन सापडले.
पोलिसांनी संशयित लाहिरीविरुद्ध NDPS कायदा 1985 च्या विविध कलमांखाली तक्रार नोंदवली असून त्याचा फोन जप्त केला आहे तसेच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पोलिसांनी सांगितले की, संशयित लाहिरी हा गेल्या तीन वर्षांपासून गोव्यात ड्रग्जची तस्करी करत होता. मात्र गोव्यात ड्रग्जचा व्यवसाय चांगला चालत नसल्याने त्याने हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला. हैदराबादमध्ये जास्त दराने ड्रग्ज विकले जाण्याची आशा त्याला होती. संशयित लाहिरीचा पुरवठादार एडमंड दिलीप स्पेन्सर परेरा याच्या शोध पोलिस घेत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.